Eknath Shinde esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्याशी आम्ही सहमत नाही; CM शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

बाळासाहेब ठाकरे यांची जी परखड भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे.

सकाळ डिजिटल टीम

राज्यपाल हे मोठं पद आहे, ते एक संविधानिक पद असून कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे.

मालेगाव (नाशिक) : महाराष्ट्रातून खास करुन मुंबई (Mumbai) आणि ठाणे येथून गुजराती आणि राजस्थानी लोकांना हटवलं तर महाराष्ट्रात पैसाच राहणार नाही. तुम्ही मुंबई आर्थिक राजधानी म्हणता; पण गुजराती (Gujarati) आणि राजस्थानी लोक नसतील तर मुंबई ही आर्थिक राजधानीच राहणार नाही, असं उद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काढले आहेत. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोश्यारींच्या वक्तव्यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिलीय.

राज्यपाल हे मोठं पद आहे. ते एक संविधानिक पद असून कुणाचाही अवमान होणार नाही, याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, असं स्पष्ट मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. ते मालेगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

शिंदे पुढं म्हणाले, मराठी माणसाच्या मेहनतीवर मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनलेली आहे. मराठी माणसाच्या अस्मितेची कुणालाही अवहेलना करता येणार नाहीय. बाळासाहेब ठाकरे यांची जी परखड भूमिका आहे, तीच आमची भूमिका आहे. त्यामुळं मराठी माणसानं आपली अस्मिता जपली पाहिजे, असंही शिंदेंनी स्पष्ट केलं. राज्यपालांचं जे काही विधान आहे, ते विधान वैयक्तिक आहे. त्यामुळं त्यांचं काम जे काही ते कोणीही नाकारू शकत नाही. मुंबई महाराष्ट्राला सहजा सहजी मिळालेलं नाहीय. मुंबईत ज्या माणसांनी योगदान दिलंय, ते कधीही विसरणार नाही. मराठी माणसाच्या प्रगतीवर ही मुंबई आहे. मुंबईला देशात अधिक महत्त्व आहे. बाळासाहेबांनी अनेकदा मराठी माणसांना मदत केलीय. मुंबईवरती किती संकट आली तरी कधीही थांबत नाही, असंही ते म्हणाले.

नाशिक दौऱ्यात शिंदेंनी विविध विकासकामांचा आढावा घेतला. आमचे निर्णय शेतकरी आणि लोकहितासाठी आहेत. राज्यात सगळीकडं सकारात्मक चर्चा सुरुय. आम्ही जनतेच्या हिताचे निर्णय अनेक दिवसांपासून घेत आहोत. पोलिस भरती सुध्दा लवकरचं निघणार आहे. लोकांच्या हिताचे सगळे निर्णय आम्ही घेणार आहोत. राज्यात जिथं-जिथं अडचण आहे, तिथं सरकार मदत करणार आहे. आरोग्य विभाग, कृषी विद्यापीठं सक्षम करण्यावर आमचा अधिक भर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT