Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde: "...तर शिंदेंनी डोक्यात गोळी झाडून घेतली असती", राजकारणातील खळबळजनक वक्तव्य

Sandip Kapde

महाराष्ट्रात गद्दार विरुद्ध स्वाभीमान असं आंदोलन सुरू आहे. विरोधक आज गद्दार दिवस साजरा करत आहेत. एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी आजच्या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील ४० आमदारांसह बंड केला होता. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा मंत्री दिपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे खळबळ माजली आहे.

एकनाथ शिंदे यांचा डाव यशस्वी झाला नसता तर त्यांनी त्यांनी सर्व आमदारांना परत पाठवलं असते आणि स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती. आमदारांसाठी शिंदेंनी जिवाची पर्वा देखील केली नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी उभे आहोत, असे केसरकर म्हणाले.

दिपक केसरकर म्हणाले, "एकनाथ शिंदे म्हटले होते मला ज्यावेळी अस वाटायला लागलं की माझा हा उठाव यशस्वी होणार की नाही. त्यावेळी मी एकच गोष्ट केली असती माझ्याबरोबर आलेल्या आमदारांना परत पाठवल असतं.मी एक फोन केला असता की माझी चूक झाली या लोकांची काही चूक नाही. अन् तिथेच मी माझ्या डोक्यामध्ये गोळी झाडून घेतली असती."

"असे म्हणणारा मनुष्य कुठल्या दर्जाचा असतो. कशा रीतीची माणुसकी त्याच्याकडे असते की माझ्यामुळे कोणत्याही आमदाराचे नुकसान होऊ नये. प्रसंगी माझा जीव गेला तरी चालेल, असे म्हणणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभी नाही राहणार तर कुणाच्या मागे उभी राहणार?", असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

बाबो! चहरची गोलंदाजी बिग बॉसच्या घरात दिसणार, दीपक चहरची खरंच एन्ट्री होणार? आवेजच्या एक्झिटनंतर शोमध्ये मोठा ट्विस्ट

Mumbai News: मुंबईतील तरुण समुद्रात अडकला... एका घड्याळामुळे कसा वाचला जीव? थरारक प्रसंग वाचा...

SCROLL FOR NEXT