eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेसाठी फक्त ३ जागा? शाहांनी दिलेल्या नाऱ्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता

Sandip Kapde

अमित शाहा कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. भाजपला देशात जरी यश मिळत असलं तरी कोल्हापूर भाजपमुक्त आहे. त्यामुळे अमिक शाहा यांनी टार्गेट कोल्हापूर फिक्स केले आहे. आज अमित शाहा यांनी कोल्हापुरात जाहीर सभा घेतली यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा भाजप आणि मोदींच्या झोळीत टाका अशी साद घातली आहे. त्यामुळे शिंदे गटाला काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. 

यापूर्वी महाराष्ट्र भाजपने राज्यात मिशन ४५ चा नारा दिला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात रालोआ ४५ पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा केला होता. आज शाहांनी ४८ जागांचा दावा केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला वरच्या फक्त तीन जागा मिळतील का?, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

लोकसभा निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. कोल्हापुरात शिंदे गटाचे वर्चस्व आहे. मात्र त्या जागेवर भाजप दावा करणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी आजची सभा नियोजित होती. 

अमित शहा याच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमित शाह कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची रणनिती आखली तसेच राज्यातील लोकसभेच्या ४८जागांवर दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT