Eknath shinde Esakal
महाराष्ट्र बातम्या

PM Modi : नवीन संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकणाऱ्यांवर CM शिंदे बरसले; म्हणे, नावडतीचं…

रोहित कणसे

देशाच्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांनी नीती आयोगाच्या बैठकीतही सरकारला विरोध केला आहे. आज (२७ मे) रोजी होणाऱ्या या नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. दरम्यान संसदेचा उद्घाटन सोहळा आणि नीती आयोगाच्या बैठकीवर विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारावर एकनाथ शिंदेंनी भाष्य केलं आहे. तसेच शिंदेंनी विरोधकांवर कडाडून टीका केली आहे.

नीती आयोगाच्या बैठकीवर टाकण्यात आलेल्या बहिष्काराबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, केंद्राकडून आम्हाला जे सहकार्य मिळतंय त्यामुळे आम्ही राज्याला पुढे घेऊन जाऊ शकतोय. त्यामुळे प्रत्येकाने काय करायचं त्याचा विचार करायचा असतो. तसेच एकनाथ शिंदे यांनी २८ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असलेल्या संसदेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांना देखील सुनावलं

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, संसद भवनाची इमारत रेकॉर्ड वेळेत पूर्ण होत आहे, ही संपूर्ण देशवासीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. संसद भवन येथूनच आपण देशभरातील जनतेला न्याय देत असतो, कायदे करत असतो. त्यामुळे अशा पवित्र मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी सर्वजण उपस्थित राहणे अपेक्षित असते.

पण काही विघ्नसंतोषी लोकं असतात. त्यांनी याला विरोध करणं म्हणजे लोकशाहीचा विरोध आहे. विरोधकांना ही जी पोटदुखी सुटली आहे, सुज्ञ जनता ही पोटदुखी चांगला जमालगोटा देऊन दूर करेल. कारण मराठीत एक म्हण आहे, नावडतीचं मीठं ही अळणी लागतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलंही काम केलं तर त्याला विरोध करत वातावरण निर्मीती करायची अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

दरम्यान आजच्या नीती आयोगाच्या बैठकीवर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान , तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि केसीआर यांनी बहिष्कार टाकला आहे. नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत.

सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रगती मैदानात ही बैठक होणार आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीत सामिल होण्यासाठी दिल्लीत रात्री उशीरा दाखल झालेत.

निती आयोगाच्या या आजच्या बैठकीचा अजेंडा पुढील 25 वर्षांत म्हणजे 2047 सालापर्यंत भारत कसा असणार हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९.३० वाजता या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर या बैठकीत सहभागी होणार आहेत.

एमएसएमई, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि , कौशल्य विकास आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा या बैठकीत आठ प्रमुख विषयांवर आज चर्चा होणार आहे.

देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे चार राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत भाजप आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष आणि समविचारी पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांच्या बहिष्काराच्या घोषणेवर भाजप नेत्यांचे काय म्हंटलं आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Crisis: महाराष्ट्रात इंधन संकटाचा स्फोट! पेट्रोल-डिझेलसाठी लांब रांगा, अनेक पंपावर ‘नो स्टॉक’ बोर्ड, वाहनचालकांचे हाल

IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Hasan Mushrif Gokul Milk Trap : अजित दादा गेले मंत्री मुश्रीफ अडकले चक्रव्यूहात, ‘गोकुळ’मधील किरकोळ चुका बनल्या गंभीर ; ईडी पुन्हा लागणार मागे?

CSK: मुंबईला त्यांच्याच भाषेत उत्तर! CSK ने रचला इतिहास जो कोणत्याही टीमला जमला नाही; 'या' बाबतीत चेन्नई ठरली नंबर १

Nagpur News: बारावीच्या परीक्षेत ‘मास कॉपी’; वर्धा, गोंदिया जिल्ह्यातील २४३ विद्यार्थ्यांवर कारवाई

SCROLL FOR NEXT