Eknath Shinde News esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंच्या खेळीणे ठाणे पालिकेत आली होती सेनेची सत्ता, भाजपच्या स्वप्नांना सुरुंग

ठाणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यात एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महापालिकेवर अनेक वर्षांपासून सत्ता आहे. महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत शिवसेनेला सत्ता मिळवून देण्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आज तेच नगरविकास मंत्री शिंदे पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार सध्या नाॅटरिचेबल आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार (Maharashtra Aghadi Government) टिकेल की पडणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Eknath Shinde Strategy Was Successful, Shiv Sena Won Thane Municipal Corporation)

ठाणे महापालिकेची २०१७ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी संकटमोचकाची भूमिका बजावली होती. ही निवडणूक शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली होती. ठाणे (Thane) शहरातून भाजपचा आमदार निवडून आल्याने पक्षाचा आत्मविश्वास वाढला होता. यामुळे भाजप काही तरी चमत्कार घडवेल अशी चर्चा होती. अन्य पक्षांमधून अनेक उमेदवार त्यांनी आयात केले होते.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रोखणे हे शिवसेनेसमोर मोठे आव्हान होते. मग अशा वेळी शिवसेनेची मजबूत पक्ष बांधणी आणि बंडखोरांना शांत करण्यात शिवसेनेला मोठे यश मिळाले. यातून पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचे नेतृत्व सिद्ध झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT