Eknath SHinde talking to a childe Sakal
महाराष्ट्र बातम्या

चिमुकलीचा CM शिंदेकडे हट्ट, "मलाही गुवाहाटीला न्या"; मुख्यमंत्री निरुत्तर

मला आधी फक्त मोदीजी आवडायचे, पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्हीही आवडू लागलाय, असंही या चिमुकलीने शिंदेंना सांगितलं.

वैष्णवी कारंजकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'फोन'वरचं कामकाज सध्या चांगलंच गाजतंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता त्यांची चर्चा होत आहे. अशातच आता एका चिमुरडीसोबत एकनाथ शिंदेंनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. मात्र तिच्या एका प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री शिंदेही निरुत्तर झाले आहेत. (CM Eknath Shinde Talking to a child)

अन्नदा नावाची ही लहान मुलगी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath SHinde) यांना भेटायला गेली होती. तिने शिंदेंशी बोलताना सांगितलं, "माझ्या मोठ्या बाबांनी मला टीव्हीवर दाखवलं होतं की तुम्ही कोरोनामध्ये लोकांची खूप मदत केली, पूर आलेला तेव्हा पाण्यात जाऊन मदत केली. मी पण जर अशी मदत केली, तर मलाही मोठं झाल्यावर मुख्यमंत्री होता येईल का?" त्यावर शिंदेंनीही हसून उत्तर दिलं की, नक्की होता येईल. आपण त्यासाठी खास रिझर्वेशन करू.

ही चिमुरडी पुढे म्हणाली, पूर्वी मला फक्त मोदीजी (PM Narendra Modi) आवडायचे, पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्हीही आवडू लागले आहेत. तसंच आता तुम्ही रुद्रांशला (शिंदेंचा नातू) त्याला वेळ कसा द्याल? असा प्रश्नही या मुलीने शिंदेंना विचारला. या चिमुरडीने एकनाथ शिंदेंकडे एक गोड हट्टही केला, ज्यामुळे ते अक्षरशः निरुत्तर झाले. ही मुलगी म्हणाली, मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं होतं, येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाल? त्यावर एकनाथ शिंदेंना काय उत्तर द्यावं, असा प्रश्न पडला. शेवटी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायचंय ना, जाऊया, असं म्हणत त्यांनी तिची समजूत काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT