Eknath Shinde Shrikant Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde : अखेर ठरलं! कल्याण लोकसभेची जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळणार

रवींद्र देशमुख

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र डॉ.श्रीकांत शिंदे खासदार असलेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघांबाबतचा वाद जवळपास संपला असून शिवसेनेच्या शिंदे गटातर्फे या ठिकाणी निवडणूक लढवली जाईल असे समजते. या जागेवरून ठाणे-कल्याण परिसरातील भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते परस्परांशी वाद घालत होते.

दरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमधील कटुता अयोग्य असल्याने टाळायला हवी. परस्परांविरोधातील हे वातावरण योग्य नसल्याचे लक्षात घेता महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यातआला. त्यानुसार, आता कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा शिवसेनेच्या शिंदे गटाने लढवावी अन्‌ ठाणे भाजपला द्यावी, असा प्रस्ताव मान्य होण्याची शक्‍यता आहे.

मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव कल्याणमधून खासदार आहेत. तरी देखील भाजपकडून बॅरनबाजी करत, कल्याणच्या जागेवर दावा करण्यात येत होता. मात्र आता यावर तोडगा निघाला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सहाजिकच भाजप आणि शिवसेनेतील संभाव्य संघर्ष टळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT