Municipal Corporation Election
Municipal Corporation Election Sakal
महाराष्ट्र

महापालिकांसह जिप निवडणुका दिवाळीनंतर, आयोगाचं न्यायालयात प्रतिज्ञापत्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील मुदत संपलेल्या २२ महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांसह पंचायत समितीच्या निवडणुका (Local Bodies Election) दिवाळीनंतरच होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणुका घेण्यास अडचणी येतात. त्यामुळे दिवाळीनंतरच्या काळात निवडणुकांचा विचार करता येईल, असं प्रतिज्ञापत्र आयोगानं (Election Commission) न्यायालयात सादर केल्याची माहिती आहे.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी ओबीसी आरक्षणासाठी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर कायदा केला. त्यानुसार निवडणुकांच्या तारखा ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. पण, या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणावर येत्या ४ मे रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत निवडणुका घेण्यासाठी येणाऱ्या अडचणी मांडल्या. तसेच मुंबईसह नागपूर, पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या महापालिकांच्या निवडणुका असल्यामुळे त्या एकाच टप्प्यात घेणे शक्य नाही. त्यामुळे दोन-तीन टप्प्यात या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. येत्या ४ जूनला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तरी जून-जुलैमध्ये निवडणुका होण्याची शक्यता नाही.

जून-जुलैमध्ये निवडणुका झाल्या नाहीतर या निवडणुका थेट दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. जवळपास ऑक्टोबर महिन्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT