imtiyaz jaleel on Aurangzeb Controversy  esakal
महाराष्ट्र बातम्या

Imtiyaz Jaleel : नामांतरावरुन उद्योजकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र; खासदार जलील म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजी नगरः औरंगाबाज जिल्ह्याचं नाव बदलून छत्रपती संभाजी नगर ठेवण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी नगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी मागील काही दिवसांपासून आंदोलनाचं हत्यार उपसलेलं असून नामांतराला विरोध केला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजी नगर येथील उद्योजकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं आहे. या पत्रामधून त्यांनी शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, शहरात सुरु असलेल्या उपोषणामुळे आणि आंदोलनामुळे परिस्थिती बिघडू शकते.. अशा आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना धाडलं आहे.

याच मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील संतापले असून उद्योजकांनी नामांतराबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, असं म्हटलं आहे. सरकारने ठेवलेलं नाव आम्हाला मान्य नाही किंवा आहे, याबाबत उद्योजकांनी बोलावं, असं आवाहन जलील यांनी केलं आहे.

लोट्यासारखं वागू नका- जलील

उद्योजकांनी नेमका स्टँड घ्यावा, लोट्यासारखं कुणीकडेही लवंडू नये. हेही पाहिजे आणि तेही पाहिजे याला काहीच अर्थ नाही. खरं-खोटं, चांगलं-वाईट याबद्दल नेमकं कोहीतरी ठरवावं, अशा शब्दात जलील यांनी उद्योजकांच्या पत्रावर भाष्य केलं.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आठवड्याभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरुवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 14 जणांवर सुमोटो गुन्हा दाखल; अंगावर चपला फेकल्यानंतर गेवराईत झाला होता राडा

Pension Reform: पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; UPS मधून NPS मध्ये जाण्याची कर्मचाऱ्यांना एकदाच संधी

Pune News : पोलिसांनी देवदूत बनून वाचवले पीएमपी चालकाचे प्राण, गजबजलेल्या लक्ष्मी रस्त्यावर टळली मोठी दुर्घटना; नेमकं काय घडलं?

Kolhapur Medical Store Raid : कोल्हापूर जिल्ह्यात नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार, ‘औषध’ विभागाची धडक कारवाई; १९ दुकाने कायमची बंद

Donald Trump : माझ्यामुळेच भारत अन् पाकिस्तानचे अणुयुद्ध टळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT