Nana Patole on Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Nana Patole on Ajit Pawar: ...तोपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कार्यमुक्त करा; नाना पटोले यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मीरा बोरवणकर यांनी केलेल्या गंभीर आरोपांची उच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यामार्फत चौकशी करावी आणि चौकशी होईपर्यंत अजित पवार यांना कार्यमुक्त करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (ex ips officer meera borwankar allegation on ajit pawar congress nana patole demand inquiry by high court judge)

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांनी पुण्यातील येरवड्याच्या सरकारी जागेसंदर्भात केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. अजित पवार यांनी सरकारी जागा खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला असल्याचं नाना पटोले म्हणाले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मीरा बोरवणकर यांनी येरवड्याची पोलीस विभागाची जागा बिल्डरच्या घशात घालण्याचा तत्कालीन पालकमंत्र्यांचा प्रयत्न होता हा जो आरोप केला आहे, त्यावर सरकारला आम्ही अधिवेशनात जाब विचारणार आहेत. पण चौकशी करा अशी मागणी केली तर सरकारच सरकारची चौकशी कशी करणार? या प्रकरणात ‘दाल में कुछ काला है’, असे नाहीतर सर्व डाळच काळी आहे.

अजित पवार यांनी त्यांच्या जवळचा बिल्डर शाहीद बलवा याला सरकारी जमीन द्यावी म्हणून आपल्यावर कसा दबाव आणला हे बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिले होतेच. पण आज पत्रकार परिषद घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करत गंभीर आरोप केले आहेत. सरकारमध्ये जर काही नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फतच या प्रकरणी चौकशी केली पाहिजे तरच सर्व सत्य बाहेर येईल, असं पटोले म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni: कॅप्टनकूलने ४४ वा वाढदिवस कुटुंबासोबत केला साजरा, आई-बाबाही होते उपस्थित; Video आला समोर

Latest Maharashtra News Updates : कोथरुड येथे खिडकीतून पडणाऱ्या मुलीला जवानाने वाचवले

Viral Video: ६ चेंडू, ६ विकेट्स! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये अविश्वसनीय विक्रम, इंग्लंडमध्ये घडला २४ तासांत अजब पराक्रम...

Maharashtra Assembly Session: 'ओम फट स्वाहा...' विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची टोलेबाजी; नितेश राणेंना म्हणाले...

बायकोसाठी कायपण ! नंदिनीला मनवण्यासाठी रिक्षावाला झाला जीवा; तर पार्थसाठी काव्या...; नवा प्रोमो पाहून नेटकरी खुश

SCROLL FOR NEXT