Rajesh_Tope 
महाराष्ट्र बातम्या

लॉकडाउन टाळायचा असेल तर...; काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का याची चर्चा जोर धरते आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली, मात्र त्या तुलनेत मृत्युदर कमी आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाउन हा पर्याय नसून निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यातील जनतेने कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. 

राज्यात कोरोना बाधित होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी  ८५ % रुग्णांना लक्षणे नाहीत. त्यामुळे त्यातील बहुतांश जणांना गृह विलगीकरणाचा सल्ला देण्यात आला आहे. परिणामी राज्यात सध्या रुग्णालयातील खाटांची कमतरता नाही, असेही ते म्हणाले. 

आरोग्यमंत्री टोपे पुढे म्हणाले, 'संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध घातले जात असून नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांकडून झाल्यास रुग्णसंख्येला आळा घालू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन टाळण्याकरिता निर्बंधांचे पालन करावे.'

राज्यात लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर गती देण्यात आली असून दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यात लसीचा तुटवडा नसून खासगी आणि शासकीय रुग्णालयांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरता प्रयत्न केले जात आहेत. ६० वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : भीषण रेल्वे दुर्घटना! मालगाडी अन् पॅसेंजर ट्रेन भिडल्या; अनेक प्रवाशांचा मृत्यू

२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान! निवडणुकीचा कार्यक्रम कसा, आचारसंहितेचा नियम काय, अर्ज कसा करायचा, मतदारांना मोबाईल नेता येणार नाही

Kalyan News: कल्याण शीळ रोडवर २ दिवस वाहतुकीत बदल, 'असे' असतील पर्यायी मार्ग

Latest Marathi News Live Update : अजित पवार गटाची उत्तर महाराष्ट्रमधील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक

Winter Birds: थंडीची चाहूल लागताच पाहुणे पक्ष्यांचे आगमन; जाणून घ्या सोलापूरमध्ये कुठे आणि कसे पाहाल पक्षीवैभव!

SCROLL FOR NEXT