Farmer Suicide in Amravati Due to Crop Failure

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

Farmer Suicide : नापिकी अन् कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यानं विहिरीत उडी मारून संपवलं जीवन

farmer committed suicide by jumping into a well :डोक्यावर जिल्हा सहकारी बँक यांचं कर्ज असल्याने ते गेल्या आठ दिवसापासून विवंचनेत होते.

Mayur Ratnaparkhe

Amravati farmer ended his life : एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी शासनाने ३० जून २०२६ ची डेडलाईन दिली असतांना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथील एका एकसष्ठ वर्षीय शेतकऱ्यानं नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोकनगर येथील शेतकरी देविदास रामचंद्र इंगळे (६१) यांच्याकडे चार एकर शेती होती. सततची नापिकी व अतिवृष्टीमुळे त्यांना चार एकरात फक्त एक पोते सोयाबीन झाले होते. तर डोक्यावर जिल्हा सहकारी बँक यांचं कर्ज असल्याने ते गेल्या आठ दिवसापासून विवंचनेत होते.

एकीकडे अस्मानी संकट असतांना शासनाच्या उदासीन धोरण व सुलतानी संकटाला समोरी जाताना या शेतकऱ्याचा संयमाचा बांध फुटला आणि अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. पहाटे चार वाजता घरातून निघून जाऊन गावालगत असलेल्या विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या केली.

यानंतर जेव्हा त्यांची शोधाशोध केली गेली, तेव्हा त्यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यावर तरंगताना आढळला. देविदास इंगळे यांच्याकडे चार एकर शेती आहे त्यांना या वर्षी चार एकरात केवळ एक पोतं सोयाबीनचे उत्पन्न झालं होतं. त्यांनी लावलेला खर्च निघाला नव्हता शिवाय, हमीभावाची सोय नसल्यामुळे वर्षभर शेतीवर अवलंबून असलेला खर्च यापुढे आपण करण्यास सक्षम नसल्याचे ते वारंवार बोलून दाखवत होते.

अखेर याच चिंतेतून त्यांनी शेवटी आत्महत्येसारखा कठोर निर्णय घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. त्यांनी घेतलेल्या टोकाच्या पावलामुळे अशोकनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.यासाठी शासनाने वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.मृत शेतकऱ्याच्या वारसाला शासकीय मदत देण्यात यावी. अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज कडू यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

Raj Thackeray : पुरावा कुठाय विचारता ना? हे घ्या! राज ठाकरेंनी फक्त आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला...

Sky Football Stadium: सौदी अरेबियातील स्काय स्टेडियमचा व्हायरल Video खोटा! समोर आलं वेगळंच सत्य

'साधी माणसं' फेम अभिनेता होणार बाबा; डोहाळे जेवणाला पत्नीसोबत थाटात केली एंट्री, होणाऱ्या आईच्या लूकने वेधलं लक्ष

Latest Marathi News Live Update : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील घेणार डॉक्टर महिला कुटुंबीयांची भेट

SCROLL FOR NEXT