Farmers Long March meeting postponed Cm Eknath Shinde Devendra Fadnavis  
महाराष्ट्र बातम्या

Farmers Long March: शेतकऱ्यांना दिलासा नाहीच; शिष्टमंडळासोबत होणारी बैठक पुढे ढकलली, काय कारण?

लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेतकरी नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लॉंग मोर्च्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार होती. मात्र ही बैठक आज रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर आजही तोडगा नाही. (Farmers Long March meeting postponed Cm Eknath Shinde Devendra Fadnavis )

युती सरकारच्या काळात म्हणजे २०१७ साली शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी अभूतपूर्व मोर्चा काढला होता. या मोर्च्यात राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या घटनेला आता पाच ते सहा वर्ष होत झाले आहेत.

Old Pension Scheme: संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा?

आता पुन्हा एकदा बळीराजा आक्रमक झाला असून, लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईत धडकणार आहे. कांद्याचा भाव, वीज माफी, अवकाळी पावसामुळे (Rain) नुकसान या सगळ्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे वारंवार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.

याप्रकरणी आज बैठक होणार होती. मात्र, ही बैठक रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. अचानक राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनीही संप पुकारल्याने शेतकऱ्यांची ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, शेतकरी नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात या लॉंग मोर्च्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार होती, मात्र ही बैठक आज रद्द करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. अजित नवले यांनी सांगितली आहे.

Shivsena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! ठाकरे गटाची शाखा पूर्णपणे शिंदेंच्या शिवसेनेत होणार विलीन

तसेच आज होणारी बैठक पुन्हा कधी होणार याबाबत काही माहिती कळवली नसल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, आजची बैठक उद्या होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

नाशिकच्या दिंडोरी येथून या लॉंगमार्चला सुरवात झाली आहे. नाशिक-मुंबई असा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. या लॉंगमार्च मध्ये कष्टकरी, कामगार, शेतकरी सर्व रस्त्यामध्ये भेटत असून सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून वन जमिनीचा प्रश्न आहे, शेतकरी कसत असलेली वन जमीन आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करावी, सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे, सोयाबीन कांद्यासह सर्व शेतीमालांना भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, आदी मागण्यांसाठी हा लॉन्ग मार्च काढण्यात आला आहे. त्यामुळं सुरक्षेबाबत पोलिसांनी मोठा फौजफाट तैनात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Cyclone Alert After Motha: मोंथा नंतर नवीन चक्रीवादळाचा इशारा! हवामान परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्ह

Sunny Fulmali : झोपडीतून सुवर्णशिखराकडे! लोहगावचा सनी फुलमाळी ठरला खऱ्या अर्थाने ‘गोल्डन बॉय’

Navneet Rana Hospitalized : माजी खासदार नवनीत राणा रूग्णालयात दाखल; २५ दिवस 'बेडरेस्ट' असणार!

Raju Shetty: ''उद्यापासून एकही साखर कारखाना चालवू देणार नाही'' प्रशासनासोबतची शेट्टींची बैठक निष्फळ

PM Modi Meet Indian Women Cricket Team : विश्वविजयी महिला क्रिकेट संघासोबत पंतप्रधान मोदी करणार 'ब्रेकफास्ट'? , भेटीची तारीख ठरली!

SCROLL FOR NEXT