पेरणी sakal
महाराष्ट्र बातम्या

१८ जिल्ह्यात कमी पाऊस! राज्यात १ टक्काच पेरणी, ७५ मि.मी.ओलावा असल्यावरच करा पेरणी

राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती.

तात्या लांडगे

सोलापूर : बहुतेक धरणांनी आता तळ गाठला असून पाऊस लांबल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. पण, आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना पेरणीची तिफण गोठ्यातच ठेवावी लागली आहे.

राज्यात खरीप हंगामातील तृणधान्याखालील क्षेत्र ३६ लाख ३७ हजार हेक्टरपर्यंत आहे. तर तेलबियांचे (भुईमूग, तीळ, कारळ, सुर्यफूल, सोयाबीन) क्षेत्र ४१ लाख ५८ हजार हेक्टर तर कापसाचे क्षेत्र जवळपास ४२ लाख हेक्टरपर्यंत आहे. ७ जूनपासून राज्यात मान्सून पावसाला सुरवात होते आणि त्यामुळे जूनअखेर दरवर्षी जवळपास ५४ लाख हेक्टरवर पिकांची पेरणी होते. मात्र, यंदा पावसाने दडी मारल्याने १७ जूनपर्यंत केवळ एक टक्के क्षेत्रावरच खरीप पिकांची पेरणी तथा लागवड झाली आहे. उजनी धरणासह राज्यातील बहुतेक धरणांनी तळ गाठला आहे. मागील वर्षी १७ जूनपर्यंत सरासरी १२०.४ मिलिमीटर पाऊस पडला होता. पण, यंदा जून महिन्यात ९० मिलिमीटर एवढाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून पेरणी केलेल्या बियादेखील उगवलेल्या नाहीत. बळीराजाचे डोळे आता आभाळाकडे लागले असून पाऊस पडल्याशिवाय बळीराजाची चिंता दूर होणार नाही, अशी स्थिती आहे.

जमिनीत असावा ७५ मिलिमीटर ओलावा

जमिनीत किमान ७५ मिलिमीटर ओलावा असल्याशिवाय शेतकऱ्यांनी बियाणांची पेरणीची घाई करू नये. पावसाची वाट पाहावी, तोवर जमिनीची मशागत करून घ्यावी.

- बाळसाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

जूनमध्ये कमी पाऊस पडलेले जिल्हे

नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये पेरणी खोळंबली आहे.

पिकनिहाय तुलनात्मक पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक एकूण क्षेत्र गतवर्षीचे क्षेत्र यंदाची पेरणी

कापूस ४१,८३,८०१ २,६९,६४० ५३,२८४

भात १४,९७,४४९ ३५,१९६ ११,८६४

तूर १२,७५,९७१ २६,५७९ १४

ज्वारी ४,८२,४६१ ८१६ ०००

बाजरी ६,७१,५९५ ७,०२२ ०००

मका ८,३८,०६० ६,०९८ ११३

उडीद ३,५८,९५३ ६,०६५ ०००

भुईमूग १,९८,४३५ ६,९९८ २०

सोयाबीन ३८,८४,६३३ ४९,९८४ ७०६

टक्केवारी १०० ३४ १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT