Farmers will get carbon credit in state maharashtra news
Farmers will get carbon credit in state maharashtra news esakal
महाराष्ट्र

Maharashtra News : राज्यात शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट मिळणार; ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर सामंजस्य करार

विनोद बेदरकर

Maharashtra News : जगाला भेडसावणाऱ्या कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण, ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियांमध्ये पारदर्शकता आणण्याच्या हेतूने सामाजिक न्याय विभागाने महाप्रीतच्या माध्यमातून पुढाकार घेत देशात प्रथमच महत्त्वपूर्ण अशा ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

अणुऊर्जा तंत्रज्ञानाच्या आधारावर शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा दर्जा वाढवून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कार्यरत असणारी ‘हिंदुस्थान ॲग्रो को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’, तसेच जागतिक स्तरावर कार्बन क्रेडिट निर्माण करणारी सर्कुलॅरिटी इनओव्हएशन हब आणि देशांमध्ये ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणण्यासाठी कार्यरत इमरटेक सोल्यूशन या संस्थांमध्ये हा सामंजस्य करार करण्यात आला. (Farmers will get carbon credit in state maharashtra news)

बदलत्या हवामानानुसार जगात कार्बन क्रेडिट निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना कार्बन क्रेडिट प्राप्त करून देण्यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत असणारे जोएल मायकल हे इंग्लंड येथून ऑनलाइन होते.

प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतमालाचा दर्जा व टिकवण क्षमता वाढविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असलेले हिंदुस्थान ॲग्रो को-ऑपरेटिव्हचे डॉ. भारत ढोकणे-पाटील यांनी या कराराच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना संधी निर्माण होणार असल्याचे सांगितले.

इमरटेक सोल्युशनचे गौरव सोमवंशी यांनी ब्लॉक चेन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रियेमधील पारदर्शकता आणण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत लाभार्थ्यांसाठी त्याच्या हिताचे प्रकल्प राबवून आरोग्य सांभाळण्याबरोबरच त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वृद्धी करणे व पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या अंमलबजावणीतून कार्बन क्रेडिट निर्माण करणे, प्लॅस्टिक क्रेडिट, ब्लॉक चेन संकल्पनांचा प्रत्यक्षात वापर करून जनहितार्थ प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

सामाजिक न्याय विभागाच्या महाप्रीत या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थ्यांसाठी व्यापक उपक्रम हाती घेण्यात आले असून, त्यातून रोजगारनिर्मिती, आधुनिक प्रशिक्षण, आरोग्याची काळजी, आर्थिक संपन्नता व एकूणच मुख्य साखळी निर्माण करून विभागाने इतर विभागांसाठी पथदर्शी ठरणाऱ्या ऐतिहासिक सामंजस्य करार घडवून आणला आहे.

सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महाप्रीत कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र देवकाते, इमरटेक सोल्युशनचे गौरव सोमवंशी, हिंदुस्थान ॲग्रो को-ऑपरेटिव्हचे डॉ. ढोकणे- पाटील उपस्थित होते.

"महाप्रीत कंपनीच्या माध्यमातून अनुसूचित जाती संवर्गातील लाभार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रमात राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना मोफत पर्यावरणपूरक निर्धूर चुलीचेही वाटप करण्यात येणार आहे." - सुमंत भांगे, सचिव, सामाजिक न्याय विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray:"मी काय ज्योतिषी आहे का?"; मतदानानंतर राज ठाकरेंचं पत्रकारांना उत्तर

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

Gullak 4: प्रतीक्षा संपली! गुल्लक-4 येणार प्रेक्षकांच्या भेटाला, कधी रिलीज होणार वेब सीरिज? जाणून घ्या

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धर्मेंद्र, गुलजार यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गजांनी बजावला मतदानाचा अधिकार

केजरीवालांच्या ड्रॉईंग रुममध्ये नाही, पण बेडरुममध्ये आहे सीसीटीव्ही; 'आप'ने सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT