Onion news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Onion News : भारतीय कांद्याला बांगलादेश बाजारपेठ दुरावण्याची भीती? पाकिस्तानचा कांदा स्वस्त

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Onion News : बांगलादेश सरकारने चीन, पाकिस्तानसह सात देशांमधून कांद्याच्या आयातीला परवानगी दिल्याची माहिती भारतीय निर्यातदारांपर्यंत येऊन धडकली आहे.

बांगलादेश सरकारची त्यासंबंधीची अधिकृत अधिसूचना अद्याप निर्यातदारांपर्यंत पोचलेली नाही.(Fear of losing market of Bangladesh to India onion maharashtra news)

मात्र, पाकिस्तान आणि चीनचा कांदा भारतीय कांद्यापेक्षा आठ ते नऊ रुपये किलो असा स्वस्त आहे. त्यामुळे बांगलादेशची बाजारपेठ भारतीय कांद्याला दुरावण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

केंद्र सरकारने निर्यात शुल्क ४० टक्के कांद्यावर लागू करताच, श्रीलंका आणि बांगलादेशमधील कांद्याच्या भावाने उसळी घेतली. त्याचवेळी पाकिस्तान आणि चीनच्या निर्यातदारांनी कांद्याचे भाव वाढविले. निर्यात शुल्क हटविण्याचा निर्णय होत नाही आणि ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

मात्र, त्यातूनही कांद्याच्या विक्रीचा तिढा शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सुटलेला नाही. मुळातच, निर्यात शुल्काप्रमाणे कांद्याच्या आगारात कांद्याचे भाव वधारल्याने आखाती देशांमध्ये पाकिस्तानचा कांदा विकला जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आखाती देशातील ग्राहकांपर्यंत भारतीय कांदा पोचणे दुरापास्त झालेले असताना श्रीलंका आणि बांगलादेशमधील ग्राहकांच्या भरवशावर निर्यातदारांकडून कांदा खरेदी केला जात होता. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याचे भाव कमी होऊ शकले नाहीत.

निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार सिंगापूरसाठी कांदा निर्यातीचा आजचा भाव टनाला ५७० डॉलर राहिला. पाकिस्तानच्या कांद्याचा भाव ४०० डॉलर होता. मलेशियासाठी भारतीय कांद्याचा भाव ५२०, तर पाकिस्तानचा भाव ३८० डॉलर आहे.

आता बांगलादेशमध्ये इतर देशांमधून कांद्याची आयात खुली होणार असल्याने भारतीय कांदा पाकिस्तानच्या किलोला आठ ते नऊ रुपये स्वस्ताईपुढे कसा टिकाव धरणार, असा प्रश्‍न तयार झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT