Ajit Pawar 
महाराष्ट्र बातम्या

ठरलं! फक्त 'इतक्या' जागा मिळणार असतील तर स्वबळावर लढणार? अजित पवार गटाने केलं स्पष्ट

Ajit Pawar group amol mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी स्वबळाची भाषा केली आहे. विधानसभा वेगळी लढू असं मिटकरी म्हणाले आहेत.

कार्तिक पुजारी

मुंबई- महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वतंत्र लढण्याची भाषा करू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी स्वबळाची भाषा केली आहे. विधानसभा वेगळी लढू असं मिटकरी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडणार आहे.

अमोल मिटकरी म्हणाले की, 'महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष म्हणतात ते प्रत्येकी १००-१०० जागा लढतील. साधारण या ३०० जागा होतात. २८८ मतदारसंघ आहेत. लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक लढवण्याचा अधिकार प्रत्येकाला दिला आहे. त्यामुळे १०० चे ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. मला वाटतं महायुतीमध्ये आम्हाला ५५ जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी राहणार नाही आणि आम्ही समाधानी देखील राहायला नाही पाहिजे.'

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे. याआधीही अमोल मिटकरी यांनी महायुतीमधील नेत्यांना नाराज करणारी वक्तव्य केली आहेत. त्यांच्या या नव्या वक्तव्यामुळे नाराजीमध्ये आणखी भर पडू शकते. विशेषत: शिंदे गटाचे नेते यावर तिखट प्रतिक्रिया देऊ शकतात. त्यामुळे शिंदे गटाकडून याला कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहावं लागेल.

येत्या काही महिन्यामध्ये राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. याशिवाय तिन्ही पक्ष जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी एकमेकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातूनच अमोल मिटकरी यांनी हे वक्तव्य केलं असावं असं बोललं जात आहे.

एकंदरीत, राष्ट्रवादी काँग्रेस यांची राज्यातील शक्ती पाहता ते स्वबळावर लढू शकतील का? आणि त्यांनी तसं केल्यास त्यांना किती जागा मिळू शकतील हा प्रश्नच आहे. तूर्तास चित्र स्पष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant संतापले! २००९चा खटला अजूनही अडकलेला... देशभरातील न्यायव्यवस्थेला दिला आदेश, पुढे काय होणार?

Marathi Breaking News LIVE: आंदेकर टोळीचे स्टेटस ठेवणाऱ्या युवकावर MPDA कारवाई

Pune–Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर महामार्ग वर्षभरात पूर्ण होणार, नितीन गडकरी यांनी दिला शब्द; रिलायन्सचे काम काढून घेतल्याचीही माहिती

जुई गडकरी की तेजश्री प्रधान! संपत्तीमध्ये कोण आघाडीवर? नेट वर्थच्या रेसमध्ये सायली की, स्वानंदी, कोण आहे पुढे?

Karad Crime: 'चाेरीप्रकरणी शिक्षकासह दाेघांना अटक'; ढवळेश्वर येथून १६ ताेळे हस्तगत

SCROLL FOR NEXT