shivsena-bjp 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : अखेर ठरलं ! 'या' अटीवर होणार युतीची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : अखेर युतीचा फॉर्म्युला ठरला आहे. काही अटीवर युतीची घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्ष 144, शिवसेना 126 तर मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोचबर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच युतीचे घोडे मात्र जागा वाटपावरून अडले होते. त्यात आज (ता.26) भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट घेऊन युती संदर्भातील अंतिम बोलणी पूर्ण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या या बैठकीत हा युती संदर्भातील हा निर्णय झाला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांनो जिवाचे रान करून कामाला लागा- दानवे

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एकेका जागेचा आग्रह कायम ठेवला. सिटिंग गेटिंगचे सूत्र मान्य केल्यानंतर देवळीत समीर देशमुखांना जागा द्या, वर्ध्यात आम्हाला अस्तित्व हवे, असा आग्रह सुरू झाला. या फुटकळ जागांवर होणारा आग्रह आज भाजपसमोरचे आव्हान ठरला होता. गणेश नाईक यांनी भाजपात प्रवेश घेतला असला, तरी ऐरोली किंवा बेलापूरची एक जागा हवीच, असेही शिवसेनेने सातत्याने नमूद केले आहे. रात्री उशिरा दिल्लीहून परतल्यानंतर फडणवीस यांची "मातोश्री'शी चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

मध्यप्रदेशातील सेक्स रॅकेटचे मराठवाड्यातील मोठ्या नेत्यांशी कनेक्शन

सोलापूर येथे सुभाष देशमुख, नाशिकमध्ये सीमा अहेर, डॉ. राहुल अहेर अशा जागांवर शिवसेनेने दावा केला आहे. अनिल गोटे आता भाजपमध्ये नसल्याने ही जागाही आम्हाला हवी, असाही शिवसेनेचा आग्रह होता. प्रत्येक विभागात आम्हाला स्वतंत्र अस्तित्व हवे, असे शिवसेनेने नमूद केले. युवासेनेलाही काही जागांवर आपले अस्तित्व दाखवायचे आहे. बाहेरून आलेल्या उमेदवारांऐवजी त्या जागा पक्षाला हव्यात, असा आग्रह आज सुरू होता.

स्वतंत्र  भारत पक्षाची पहिली यादी जाहीर

भाजपने 120च्या वर एकही जागा देणार नाही, अशी भूमिका प्रारंभी घेतली होती. शिवसेनेने प्रचंड आग्रह धरत 130 मतदारसंघांची मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्यामार्फत आज सकाळपासून "मातोश्री'वर उद्धव ठाकरेंशी संपर्क ठेवत जागावाटप अंतिम टप्प्यापर्यंत नेले. युतीची आकडेमोड नक्‍की करण्यासाठी केवळ आजचाच दिवस असल्याचे दोन्ही पक्षांनी ठरविले होते.

शिवसेना शरद पवारांच्या पाठीशी; ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद

शिवसेनेला पुणे, सोलापूर, नाशिक, धुळे या शहरांमधील मतदारसंघ हवे होते, तसेच बाहेरून आलेल्यांचे मतदारसंघ शिवसेनेचे का भाजपचे? यावरून आज प्रश्‍न निर्माण झाले. शिवसेनेने या वेळी भाजपकडे असलेल्या मतदारसंघांपैकी एकही जागा मागू नये; अन्यथा युती होणे शक्‍य नाही, असे कळविल्यानंतर अखेर त्यांनी नमते घेतले. मात्र, भाजपने ज्या मतदारसंघात शिवसेनेने आधी लढत दिली होती तेथे बाहेरून उमेदवार आणले आहेत, ते मतदारसंघ आम्ही कसे सोडणार, असा प्रश्‍न करीत ठाकरे पिता-पुत्रांनी आजअखेरपर्यंत आपले मतदारसंघ देण्यास नकार दिला होता. अखेर भाजप यासंबंधात कोणतीही तडजोड करण्यास तयार नाही, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने नमते घेतल्याचे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

Ashadhi Wari 2025: वारकऱ्यांसोबत श्वानाची पंढरपूर वारी! महिनाभरात पालख्यांबरोबर चालत पोचतोय विठ्ठलचरणी

"उपाध्येंना अटेंशनची सवय.." निलेश साबळे-शरद उपाध्ये वादावर मराठी कलाकार व्यक्त ; म्हणाले...

PCMC News : आणखी तेरा ठिकाणी स्वस्त धान्य दुकाने; पुणे, पिंपरी-चिंचवड क्षेत्रांतील नागरिकांना ३१ जुलैपर्यंत करता येणार अर्ज

Hinjewadi News : हिंजवडी फेज २ ते लक्ष्मी चौक रस्ता होणार खुला; रस्त्यातील अतिक्रमणांवर ‘पीएमआरडीए’कडून कारवाई

SCROLL FOR NEXT