Five people killed In accident 
महाराष्ट्र बातम्या

विठ्ठल दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पेला अपघात; पाच ठार

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कार्तिक वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला भीषण अपघात होऊन मंडोळी आणि हंगरगे ( ता. बेळगाव) येथील पाचजण जागीच ठार तर, सातजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात संगोल्या पासून दहा किलोमीटर अंतरावर घडला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अद्याप मृतांची समजू शकली नाहीत.

कार्तिकी वारीनिमित्त मंडोळी येथील वारकरी हंगरगेच्या बुलेरो टेम्पोतून बारा जण गुरुवारी (7 नोव्हेंबर) रात्री पंढरपूरला निघाले होते. संगोल्यापासून दहा किलोमीटर अंतरावर विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकटरच्या ट्रॉलीला टेम्पोने मागून जोराची धडक दिली. धडक इतकी भीषण होती की टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर झाला. यात टेम्पो चालकासह पाचजण जागीच ठार झाले. सात जण गंभीर जखमी झाले. अपघातातनंतर काहींनी बचावकार्य सुरू केले. मात्र, टेम्पोच्या पत्र्यात अडकून पडलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. अपघातानंतर महामार्गवर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतांना बाहेर काढत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पंढरपूरला जाणाऱ्या बेळगावच्या इतर वाहन चालकांना अपघाताची माहिती मिळताच मंडोळी आणि हंगरगे गावात संपर्क साधून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे. मृतांचे नातेवाईक नाही गावकरी घटनास्थळी रवाना होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

ENG vs IND, 3rd Test: रिषभ पंत आर्चरचा लॉर्ड्सवर सामना करण्याबद्दल म्हणाला, 'तो परत येण्याचा मला...'

Video: मी इथेच आहे, तुझ्यासोबत! पत्नी आयसीयूमध्ये, पतीने हात धरला अन्...; वृद्ध जोडप्याचा व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

Viral Video: कसाबसा जीव वाचला! रस्त्याची पाहाणी करायला आलेल्या अभियंत्यासमोरच कोसळला ट्रक, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

SCROLL FOR NEXT