Bhagat Singh Koshyari esakal
महाराष्ट्र बातम्या

Bhagat Singh Koshyari: अनंत अंबानींकडून घेतलेल्या 15 कोटींचं काय केलं? भगतसिंग कोश्यारींचे स्पष्टीकरण

Bhagat Singh Koshyari: राज्यपाल असताना भगतसिंग कोश्यारी यांनी अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपये घेतले होते. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Sandip Kapde

Bhagat Singh Koshyari : महाराष्ट्राचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल असताना त्यांच्या संस्थेला किती देणग्या मिळाल्या असा प्रश्न महाराष्ट्र राजभवनाला विचारला होता. मात्र, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे राजभवनाने म्हटले आहे. 

दरम्यान, अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळाले असून त्यात महाराष्ट्र आणि उत्तराखंडमध्ये खळबळ माजली होती. एका शाळेच्या नावावर 15 कोटी रुपयांची देणगी घेतल्याच्या आरोपावर भगतसिंग कोश्यारी यांच्यावर करण्यात आला होता. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले, मी महाराष्ट्राचा राज्यपाल होतो आणि सर्वसामान्यांसाठी माझे दरवाजे नेहमीच खुले असायचे. सामाजिक कार्याकडे माझा नेहमीच कल होता. एके दिवशी मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी माझ्याकडे आला. आम्ही एकमेकांशी बोललो. मी अखिल भारतीय संस्थान विद्या भारती विषयी बोललो. जी भारतभरात 20,000 हून अधिक शाळा चालवते.

नैनितालमध्ये पार्वती प्रेमा जगती सरस्वती विहार आहे, जी गेली 40 वर्षांपासून सुरू आहे आणि एक नामांकित निवासी शाळा आहे. लोकांच्या मागणीनुसार, आणखी शाळा उघडल्या जात आहेत. मी अनंत अंबानी यांना सांगितले की, शाळेसाठीही निधी द्या, ज्याचा फायदा ग्रामीण भागालाही होईल आणि त्यांनंतर त्यांनी 15 कोटी रुपये दिले, असे कोश्यारी यांनी सांगितले.

काय होता आरोप?

राज्यपालपद भूषवलेल्या भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून उत्तराखंडमधील शाळेच्या नावावर बरीच संपत्ती जमा केली. ज्या शाळांमध्ये 100 मुलेही शिकत नाहीत अशा शाळांसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात देणग्या गोळा केल्या.

या पैशातून तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांचे पुतणे दीपेंद्र सिंह कोश्यारी यांनी शाळेच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करून त्या ठिकाणी रिसॉर्ट सुरू केले. त्यासाठी उद्योगपती अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपये घेण्यात आले, असा आरोप एका आरटीआय कार्यकर्त्याने केला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT