Pankaja Munde big statement regarding Maratha reservation 
महाराष्ट्र बातम्या

Pankaja Munde : मराठा आरक्षण न टिकवण्यासाठी 'ही' समितीचं जबाबदार; पंकजा मुंडेंचा थेट आरोप

मराठा आरक्षणाला न टिकविण्यासाठी या समितीनं जो मसुदा तयार केला तो जबाबदार आहे.

किरण बोळे

मराठा आरक्षणाबाबत माझ्यासह मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मत ठाम आहे.

फलटण शहर : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा आरक्षणासाठी जी समिती आहे, त्यांना यावर त्यांचं मत विचारा. मराठा समाजाच्या आरक्षणाला न टिकविण्यासाठी या समितीनं जो मसुदा तयार केला तो जबाबदार आहे. जर तो मसुदा नीट असेल, तर मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण देता येईल, असं प्रतिपादन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं.

पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमाचे फलटण येथे आगम झाले. या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी त्यांचे जल्लोषी स्वागत केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आंदोलकांबाबत जो प्रकार झाला त्या घटनेची निःपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, ‘‘मराठा आरक्षणाबाबत माझ्यासह मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मत ठाम आहे. त्यामुळं आम्हाला आमचं मत विचारण्यापेक्षा याबाबत संबंधित कमिटीला का विचारत नाही, असा सवाल त्यांनी केला.

मुंडे म्हणाल्या, ‘‘शिवशक्ती परिक्रमेस मोठा प्रतिसाद मिळत आहे. लोक प्रेमाने स्वागत करीत आहेत व अत्यंत सन्मानाने पाहुणचार करीत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT