tanaji savant esakal
महाराष्ट्र बातम्या

माजीमंत्री सावंत म्हणाले..! शिवसेनेचा मुख्यमंत्री, तरीही अर्थसंकल्पात दहा टक्‍केच निधी

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला केवळ 16 टक्केच निधी दिला. त्यातही उच्च शिक्षण विभागाचा सहा टक्‍के निधी वेतनावरच खर्च होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने 57 टक्के, तर कॉंग्रेसने 34 टक्के निधी घेतला.

सकाळ ऑनलाईन

सोलापूर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री असतानाही राज्याच्या अर्थसंकल्पात शिवसेनेला केवळ 16 टक्केच निधी दिला. त्यातही उच्च शिक्षण विभागाचा सहा टक्‍के निधी वेतनावरच खर्च होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने 57 टक्के, तर कॉंग्रेसने 34 टक्के निधी घेतला. सत्तेत असूनही शिवसेनेच्या आमदारांची कामे मित्रपक्षाच्या मंत्र्यांकडून होत नाहीत. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य कोट्यवधीचा निधी आणतो आणि आमच्या नाकावर टिच्चून कामे करतो. शिवसैनिकांना मात्र शिवभोजन चालवून पाच हजाराच्या बिलांसाठी महिना-महिना वाट पाहवी लागत असल्याची खंत आमदार तानाजी सावंत यांनी व्यक्त केली.

युवा सेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिरात माजीमंत्री सावंत बोलत होते. युवसेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यासमोरच त्यांनी शिवसेनेवरील अन्यायाचा पाढा वाचला. शिवसेनेमुळे सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी व कॉंग्रेसने शिवसेनेवर अन्याय केला असून नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पातून हे स्पष्ट दिसत असल्याचे सावंत यांनी सांगितले. या दोन्ही मित्रा पक्षाबद्दल शिवसेनेच्या सर्व आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. यावर उत्तर देताना वरुण सरदेसाई म्हणाले की, दोन्ही कॉंग्रेस हे नवे मित्र आहेत. यापूर्वी तीस वर्षे ते शिवसेनेचे विरोधक होते. जुन्या मित्रांनी तीस वर्षे फसविले म्हणून नवे मित्र करावे लागले. त्यांनीही सुधारण्याची संधी द्यावी, असे सरदेसाई म्हणाले. आमदार सांवत यांची ही खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांच्यापर्यंत पोहचवू असेही वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

आघाडी धर्माचे राष्ट्रवादीकडून उल्लंघन
आमदार तानाजी सांवत म्हणाले, बुलढाणा विधानसभेच्या पोटनिवणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारास पाडून अपक्ष उमेदवार निवडून आणण्यात आला. खेड पंचायत समिती राष्ट्रवादीने आघाडी धर्म पालन न करता ताब्यात घेतली. अहमदनगरचे नगरसेवक राष्ट्रवादीने फोडले. सोलापूर जिल्ह्यातही तेच केले. उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचा अध्यक्ष शिवसेनेचा करण्याचे ठरविण्यात आले. मात्र अचानक दोन्ही कॉंग्रेसने एकत्र शिवसेनेला वगळून अध्यक्ष व उपाध्यक्षपद घेतले. कोल्हापूर पोटनिवडणुकीत दोन वेळा आमदार झालेले राजेश क्षीरसागर यांना घरी बसावे लागल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट शिवसैनिक पाहत आहेत. अन्यथा अन्याय सहन करणे हा शिवसैनिकांचा स्वाभाव नाही. शिवसैनिक मुळात तळागळातील रस्त्यावरच सर्वसामन्य माणुस आहे. त्याला सत्तेची ओढही नाही आणि सवयही नाही, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT