Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: ठाकरे गटाच्या नेत्याची भाजप आमदारासोबत बंददाराआड चर्चा; शिंदे गटासाठी धोक्याची घंटा?

शिंदे गट आणि भाजपमध्ये कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून वाद सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावरून गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये दावे-प्रतिदावे करणं सुरू झालं आहे. भाजपच्या नेत्यांनी आणि आमदाराने या मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळे शिंदे गटाची गोची झाली आहे. हा वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची भेट घेतली आहे. तर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड अर्धा तास काय चर्चा झाली. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.(Latest Marathi News)

तर सुभाष भोईर भाजपमध्ये प्रवेश करणार की भोईर-गायकवाड भेट हा शिंदे गटासाठी धोक्याची घंटा आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघामध्या मागील काही दिवसापासून वाद होताना दिसुन येत आहेत, अशातच या भेटीमुळे शिंदेगटाची डोकेदु:खी वाढण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

तर बंद दरवाजाआड या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी? भोईर लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच करत आहेत का? की भोईर भाजपमध्ये प्रवेश करतील? श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी बळ मिळावं म्हणून भोईर यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत? असे सवाल या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत.(Latest Marathi News)

तर योग्य वेळी आम्ही योग्य चर्चा करू असे सूतोवाच दरम्यान आमदारांनी दिल्याने उपस्थित साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रिय झाले असताना ठाकरे गट आणि भाजप पक्ष यांच्या आमदारांच्या या भेटीने भविष्यात कल्याण लोकसभा मतदारसंघातील सत्तेची गणिते बदललेली पहायला मिळतील का ? या चर्चांना उधाण आले आहे.(Latest Marathi News)

राज्यात मित्रपक्षात धुसफूस सुरू असून ठाणे जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदार संघाची जोरदार चर्चा आहे. शिंदे गटाच्या या हक्काच्या जागेवर भाजप देखील दावा करत शिंदे यांना आव्हान देऊ केले आहे.

भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनरवर भावी खासदार असा भोईर यांचा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा देऊ केल्या. याचबरोबर राष्ट्रवादीचे माजी आमदार आनंद परांजपे हे देखील पुन्हा सक्रिय झाले असून त्यांच्या ही नावाची चर्चा इच्छुक उमेदवारांत केली जात आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

Ashadhi Wari: पंढरपूरला चातुर्मासात रोज कीर्तनाची साडेतीनशे वर्षांची परंपरा

Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द

SCROLL FOR NEXT