महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकार इंधन दरात कपात करणार? उपमुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज याबद्दल खुलासा केला आहे.

सुधीर काकडे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिलेल्या एका माहितीमुळे अनेकांचा भ्रमनिरास होऊ शकतो. केंद्र सरकारने काही दिवसांपुर्वी उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानंतर केंद्राने राज्यांनाही कर कमी करण्याची विनंती केली होती. अनेक राज्यांनी कर कपात करून पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी केले आहेत. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी याबद्दल प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. पंढपुरमध्ये असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्याकडे उत्पन्नाच दुसरं साधन नाही, असे म्हणत मुख्यमंत्री अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील दरात कपात होईल अशी आशा असलेल्या राज्यातील नारगिकांचा भ्रमनिरास केला आहे. सरकार सध्या तरी कर कपातीचा विचार नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं आहे. येत्या अधिवेशनापूर्वी कर कमी करायचे झाल्यास, किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

दरम्यान, कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पहाटे श्री विठ्ठल- रुक्‍मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पडीक जमीनीबद्दलच्या विधानाचा विपर्यास, बावनकुळेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, शेतकऱ्यांशी संबंध नाही

IND vs NZ 2nd Test: विजयाचा 'घास' गेला, आता भारत-न्यूझीलंड दुसरा सामना केव्हा? करो वा मरो मॅच कुठे Live दिसणार?

Gold Rate Update: सोनं आणखी स्वस्त होणार की महागणार? खरेदीआधी 'या' 3 तारखा लक्षात ठेवा

परदेशात प्रिया बेर्डेंना चुकीची वागणूक, पाठीशी उभे राहिले जॉनी लिव्हर; अख्ख शूटिंग थांबवलं, शेवटी मॅनेजरने...

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा? विश लिस्टवर म्हणाले...

SCROLL FOR NEXT