Gajanan Maharaj sakal
महाराष्ट्र बातम्या

Gajanan Maharaj: गजानन महाराजांच्या भक्तांसाठी मोठी बातमी; शेगाव मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर राहणार खुले

सकाळ डिजिटल टीम

Gajanan Maharaj: सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागताकरिता तसेच संत गजानन महाराजांच्या द्वारी नवीन वर्षाचे संकल्प करण्याकरिता अनेकजण शेगाव नगरीत दाखल होत असतात. त्यामुळे शेगावात भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी होत असते. हीच संभाव्य गर्दी लक्षात घेता श्री गजानन महाराज यांचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

सध्या नाताळच्या सुट्या सुरु असून, २५ डिसेंबरपासून शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गदीं दिसून येत आहे. यामध्ये अनेक भाविक कुटुंबासह मुक्कामी राहण्याच्या बेताने दाखल झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे या उद्देशाने रविवार ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरवात करता येईल. श्रींच्या भाविकांसाठी संस्थानच्या वतीने दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. भक्तांना कोणताही त्रास होवू नये यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT