Ganesh Naik Pre arrest bail application rejected Ganesh Naik Pre arrest bail application rejected
महाराष्ट्र बातम्या

गणेश नाईकांवर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांचा ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज शनिवारी (ता. ३०) फेटाळला आहे. यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. तसेच धमकावल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. (Ganesh Naik Pre arrest bail application rejected)

शनिवारी गणेश नाईक यांचा ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. गणेश नाईक यांच्यावर बलात्कार आणि धमकावणे अशा प्रकारचे दोन गुन्हे दाखल आहेत. नाईक यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज फेटाळल्याने त्यांच्यावरील अटकेची टांगती तलवार कायम असल्याचे दिसून येते.

गणेश नाईक (Ganesh Naik) हे दिपा चौहान या महिलेसोबत २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, या महिलेने आपल्या जिवाला धोका असल्याचे म्हणत नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. महिलेला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी नाईक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केला होता. मात्र, त्यांनी ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्जासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Pre arrest bail application rejected) फेटाळला. त्यामुळे नाईक यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

दिपा चौहान व गणेश नाईक (Ganesh Naik) २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशीप होते. या रिलेशनशीपमधून महिलेला एका मुलगा झाला. आता मुलाला गणेश नाइकांनी स्वीकारण्यास नकार दिला. मार्च २०२१ मध्ये आमदार गणेश नाइकांनी मला सीबीडी रेतीबंदर येथील लखानी टॉवर्ससमोरील इमारतीत बोलावून घेतले. तिथे मी मुलाला त्यांचे नाव देण्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी माझ्यासमोर बंदूक ठेवून त्रास देऊ नको, असे सांगत ‘तू शांत राहिली नाहीस, तर मी स्वतःलाही संपवेन आणि तुम्हा दोघांनाही संपवेन’, अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT