bjp,mns esakal
महाराष्ट्र बातम्या

मनसे-भाजप युती होणार? गिरीश महाजन म्हणाले,वरिष्ठांचा निर्णय...

राजकारणात काही अशक्य नाही-गिरीश महाजन

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ठाणेतील उत्तर सभेनंतर भाजप आणि मनसे युती होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऱाज ठाकरे हे भाजपाची बी-टीम असल्याचेही बोलले जात आहे. यावरून आज सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सडेतोड उत्तर दिले. दरम्यान भाजप नेते आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीही एका खासगी वाहिनीला या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, राज ठाकरे हे हिंदुत्वाचे विचार मांडत आहे. वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात निर्णय होणार असून मनसे सोबत भाजपाची युती होऊ शकते असे संकेत गिरीश महाजन यांनी दिले आहेत. राजकारणात काही अशक्य नाही. हा सर्व प्रश्न आमच्या वरिष्ठांचा आहे. ते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे म्हणतात राज यांच हिंदुत्व हे बनावटी आहे. ते बनावटी हिंदू हृदयसम्राट बनायचा प्रयत्न करत आहेत. मात्र कोण ओरिजिनल कोण डुप्लिकेट हे जनता ठरवेल. निवडणुकीत त्यांना उत्तर मिळेल असा इशाराही त्यांनी दिला. राज ठाकरे हिंदुत्वावर बोलत आहेत हे चांगलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात स्पर्धा असल्याचेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT