Girish Mahajan reaction to Sushilkumar Shinde claim that BJP made offer to him and Praniti Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics : सुशिलकुमार म्हणतात मला भाजपची ऑफर... गिरीश महाजनांनी केलं स्वागत; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?

माझा दोन वेळा पराभव झाला तरी देखील मला किंवा प्रणिती शिंदे यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे.

रोहित कणसे

माझा दोन वेळा पराभव झाला तरी देखील मला किंवा प्रणिती शिंदे यांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे. अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात बोलताना शिंदे यांनी हे विधान केलं आहे. यानंतर भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे येणार असतील तर त्यांचं स्वगतच केलं जाईल अशी प्रतिक्रिया दिल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे काय म्हणाले?

अक्कलकोट येथील एका कार्यक्रमात बोलताना सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, प्रणितीताई किंवा मला भाजपकडून ऑफर दिली जाते. पण ते कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथं आमचं बालपण गेलं, आमचं तारुण्य गेलं आता मी ८३ व्या वर्षात आहे. आता कसं दुसऱ्याचं घर उभं करणार. शक्य नाही आणि प्रणिती देखील तुम्हाला माहिती आहे ती देखील कधीही पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही. असं राजकारणामध्ये होतं राहतं.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार...

दरम्यान सुशिल कुमार शिंदेंच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, सध्या मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक लोकांना काँग्रेसमध्ये आपलं भविष्य नाही असं वाटायला लागलं आहे. देशाचा विश्वास मोदींवर आहे. त्यामुळे सहाजिक आहे. सुशिलकुमार शिंदे हे काँग्रेसमधील मोठे नेते आहेत, त्यांना कोण बोललं याचा खुलासा त्यांनी केला नाहीये. पण आमच्याकडे अनेक लोकं आमचा विचार करा, पक्षामध्ये घ्या, आमचं बोलणं करून द्या असे म्हणत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाल्याचे पाहायला मिळेल.

सध्या सगळ्यांनाच भाजपमध्ये यावं वाटत आहे, त्यामुळे ही पुढची काहीतरी चाहूल असू शकते असेही महाजन म्हणाले. सुशिल कुमार यांच्याशी माझं बोलणं झालं नाही, पण ते ऑफर आलीय असं सांगत आहेत. पण अनेकांना भाजपशिवाय पर्याय नाही असं वाटतंय. काँग्रेसमध्ये काही राहिलेलं नाहीये. सर्वजण बार बार मोदीजी असं म्हणत आहेत.

भाजप शिंदेंना पक्षात घेण्यासाठी उत्सुक आहे का? या प्रश्नावर का नसेल? सुशिलकुमार शिंदे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. मुख्यमंत्री राहिले आहेत, काँग्रेसचं केंद्रात नेतृत्व केलं आहे. आम्हाला काही अडचण नाही, आम्ही घेणार नाही म्हणणार नाही. सुशिलकुमार शिंदे येत असतील तर त्यांचं स्वागतच करू. पुढच्या काही दिवसातच खूप मोठी लोकं इकडे आलेले दिसतील असेही गिरीश महाजन म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT