rajyasabha election 2022 latest political news
rajyasabha election 2022 latest political news 
महाराष्ट्र

रणनीती ठरलीये, राज्यसभेचा गुलाल महाडिकच उधळणार, गिरीश महाजनांचा दावा

सकाळ डिजिटल टीम

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव समोर दिसत असल्याने ते बिथरलेत

सध्या राज्यसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. गाठीभेटी आणि आरोपप्रत्यारोपांसह घडामोडींनाही वेग आला आहे. प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार निवडून यावा यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. घोडेबाजार होऊ नये म्हणून आमदारांची लपवा छपवी सुरु आहे. हे सर्व सुरु असताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी उमेदवार कोल्हापूर भाजपाचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविषयी बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे. (rajyasabha election 2022 latest political news)

राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव समोर दिसत असल्याने ते बिथरले आहेत. त्यामुळे हॉटेल टू हॉटेल त्यांच्या नेत्यांची धावपळ सुरू आहे. आमची रणनीती पक्की झाली असून कोणत्याही परिस्थितीत आमचे धनंजय महाडिक विजयी होणार आहेत. राज्यसभेचा गुलाल कोल्हापूरच्या महाडिकांना लागणार हे आपण खात्रीशीर सांगत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

भाजपने राज्यसभा निवडणुकीत पक्षाचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी तिघांवर सोपवली आहे. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचाही समावेश आहे. यासाठी महाजन यांच्या भेटीगाठींना वेग आला आहेत. यासंदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, लहान पक्ष व काही अपक्ष आमदार आमच्या सोबत आहेत. आमच्याकडे तिसरा उमेदवार जिकण्याइतके पुरेसे संख्याबळ आहे. त्यामुळे तिसरा उमेदवार विजयी होणारच हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो.

पुढे ते म्हणाले, शिवसेनेचे आमदाराच पक्षावर नाराज आहेत. ते आता जाहीरपणे मंत्री टक्केवारी घेत असल्याची टीका करत आहे. घटक पक्षातील बच्चू कडू, अबू आझमी नाराज आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसत आहे. त्यामुळे महाविकासच्या नेत्यांची हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे. त्यांना आपल्याच आमदारांवर भरोसा राहिलेला नाही त्यामुळे आमचा विजय निश्चित असून राज्यांतील बदलाची ही नांदी असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Anjali Arora: कच्चा बदाम गर्ल अंजली अरोरा साकारणार सीतेची भूमिका; म्हणाली, "साई पल्लवीसोबत जर तुलना झाली तर..."

SCROLL FOR NEXT