Devendra Fadnavis-Sharad Pawar
Devendra Fadnavis-Sharad Pawar esakal
महाराष्ट्र

फडणवीस 10-20 पवार खिशात घालून फिरतात: पडळकांचा राष्ट्रवादीवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

शरद पवार ज्येष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे.

चार राज्यात विधानसभा निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आता महाविकास आघाडीला अप्रत्यक्षरित्या चॅलेंज करण्यास सुरुवात केली आहे. गोव्यात भाजपची सत्ता स्थापनेची तयारी करून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज मुंबईत आले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकरही (Gopichand Padalkar) उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला.जलने वाले जलते रहेंगे कमल के फुल खिलते रहेंगे असा टोला पडळकरांनी लगावला.

काय म्हणाले पडळकर

देवेंद्र फडणवीस दहा विस पवार खिशात घालून फिरतात. शरद पवार जेष्ठ आहेत पण श्रेष्ठ नाहीत. काही जरी केलं तरी मीच केलं, कोणी माझ्या पुढे जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. याउलट त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांच आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा, राष्ट्राच्या विरोधात भूमिका जी शरद पवारांकडे आहे तसले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आहे असा घणाघात पडळकरांनी केला.

अर्थसंकल्प अधिवेशाबद्दल बोलताना पडळकर म्हणाले, धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यभर वसतीगृह काढण्याचा निर्णय घेऊनही, काहीच झाले नाही.याचे काम कधी सुरू होणार? तसेच धनगर समाजाला दरवर्षी दहाहजार घरकुल योजनेतील जाचक अटी काढल्या जाणार का? व गेल्या तीन वर्षातला बॅकलॅाग भरून निघणार का? असा प्रश्न उपस्थित केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT