gopichand padalkar ,sharad pawar
gopichand padalkar ,sharad pawar esakal
महाराष्ट्र

शरद पवार करतात एक अन् दाखवतात एक - पडळकर

सकाळ डिजिटल टीम

पुणे: यशवंतराव होळकरांचा किल्ला सुबेदार होळकरांनी बांधला आहे. यशवंतराव होळकरांनी सलग २५ इंग्रजांशी लढा दिला आहे आणि तो जिंकलाही आहे. आता तो किल्ला राज्य सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी भाजपा नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. आज पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी हि मागणी केली.

विधानभवनासमोर गोपीचंद पडळकर आंदोलन करणार आहेत. वाफगावमधील यशवंतराव होळकर यांचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातील किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

यशवंतराव होळकर यांचा किल्ला रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यातील किल्ला सरकारने ताब्यात घ्यावा अशी मागणी केली

पडळकर म्हणाले, शरद पवारांना बहुजनांचा इतिहास मोडीत काढायचा आहे. समाजाचा विरोध असतानाही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यांचे उद्घाटन त्यांनी केले. महाराज यशवंतराव होळकरांचा जन्मस्थान असलेला वाफगावचा किल्ला त्यांनी ताब्यात ठेवला आहे. करायचं एक अन दाखवायचं एक अशी त्यांची प्रवृत्ती आहे असा टोलाही त्यांनी हाणला. मात्र आम्ही समाजातील जेष्ठांनी, होळकर घराण्यातील व्यक्तीशी चर्चा करणार आहोत. आम्ही आता लोकवर्गणीतून किल्ल्याचा जिर्णोद्धार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, जेजुरीत जाता पण वाफगावच्या किल्ल्याबद्दल तुम्ही बोलत नाही. आता किल्ला राज्य सरकारच्या ताब्यात द्या, अन्यथा आम्ही ताब्यात घेऊन किल्ल्याचा जिर्णोद्धार करू, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT