gopichand padalkar sakal media
महाराष्ट्र बातम्या

पावसात भिजूनही ५४ च्या वर जाता आले नाही, पडळकरांची शरद पवारांवर टीका

राज्यातील जनता भारतीय पक्षाबरोबर आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आगामी २०२४ मध्ये महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार येईल, असा विश्वास भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला होता. त्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, भाजपला सत्तेत येऊ देणार नाही.

पवारांच्या या वक्तव्यावर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी टीका केली आहे. २० वर्षांमध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही. त्यांनी भाजपची (BJP) चिंता करु नये, असा सल्ला त्यांनी पवारांना दिला. २०१९ साली विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. (Gopichand Padalkar Criticize Sharad Pawar Over Assembly Election)

फडणवीसांना महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्रीपदावर पुन्हा बसवण्यासाठी भाजप १०६ आणि शिवसेनेचे ५५ आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिले. मात्र तुम्ही विश्वासघात करुन सत्तेत आला, असे पडळकर म्हणाले. राज्यातील जनता भारतीय पक्षाबरोबर आहे. त्यामुळे तुम्ही कितीही संघर्ष केला, २०१९ मध्ये साताऱ्यात पावसात भिजूनही तुम्हाला ५४ च्या वर जाता आले नसल्याची टीका पडळकर यांनी शरद पवारांवर केली.

त्यांना ५४ ची संख्या टिकवून ठेवण्यासाठी वारंवार आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. घाबरु नका, काळजी करु नका, असे त्यांना सांगावे लागतयं. मात्र तुमच्या हातात काही नाही, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT