Sangli esakal
महाराष्ट्र बातम्या

'राज्यसरकारचे नेते पवारांच्या ताटाखालचे मांजर झालेले मंत्री'

शेतकऱ्यांना येणाऱ्या आवाजी बिलाविरोधात आज विधान परिषदेत विरोधक आकमक झाले.

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांना येणाऱ्या आवाजी बिलाविरोधात आज विधान परिषदेत विरोधक आकमक झाले.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विविध विषयांवरून आजही विरोधक आक्रमक झाले आहेत. टीईटी, म्हाडा, आरोग्य विभागाच्या भरती घोटाळ्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, केंद्राच्या नावाने ओरड करायचा प्रयत्न केला ही दुर्दैवी गोष्ट आहे असं म्हणत पडळकरांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या भरमसाठ बिलाविरोधात आज विधान परिषदेत विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी सभात्याग करत सरकारवर टीका केली आहे.

यावेळी पडळकर म्हणाले, सदाभाऊ खोत यांनी वीज बिलाबाबत लक्षवेधी बाजू मांडली. ती चुकीची बिले आधी तुम्ही दुरुस्त करा, मग आम्ही बिल भरू. पण राज्य सरकारकडे याबद्दल उत्तर नाही त्यांनी पुन्हा हा विषय केंद्राकडे ढकलला आहे. ज्याला तुम्ही कनेक्शन दिलं नाही, त्याला बिल देता आणि मग तुम्ही सांगता 60 हजार कोटी बिल थकीत आहे. हे सर्व सत्ताधारी नेते पवारांच्या ताटाखालची मांजर झालेले मंत्री आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

दरम्यान, बुलढाण्याच्या एका शेतकऱ्यानं २० वर्षापूर्वी अर्ज केला. आजही त्याला कनेक्शन मिळालं नाही. ६ डिसेंबर २०२१ ला त्याला वीजबील दिलंय. शिवाय दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या मोटारी बंद असूनही त्याला भलं मोठं बिल दिलं आहे. जर तुम्ही अशी बोगस बिलं दिली असतील तर तुम्ही खात्याला बिलं दुरुस्त होणार नाही तोपर्यंत वीज कनेक्शन तोडणार नाही याचे आदेश देणार का? तोडलेले कनेकश्न जोडण्याचे आदेश देणार का? बिल दुरुस्तीचे कँप घेणार का? डीपीचा लोड कमी जास्त होतोय ते तुम्ही सुरळीत होणार का? असे प्रश्न पडळकरांनी विचारले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अन्याय, भ्रष्टाचारावर शांत बसत असाल तर…, तुकाराम मुंढेंच्या पोस्टने लक्ष वेधलं

Ganeshotsav Rain Forecast : गुड न्यूज! महाराष्ट्रात पुन्हा पावसाला पोषक हवामान; गणेशोत्सव काळात जोरदार पावसाचा अंदाज

Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Monsoon: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यातील ८३ तालुक्यांत २० दिवसांहून अधिक पाऊस गायब; खरीप पिके करपण्याच्या मार्गावर

Amruta Fadnavis: गरबा सर्वसमावेशक उत्सव; मुस्लिमांच्या प्रवेशाला विरोध का? अमृता फडणवीस यांची भूमिका

SCROLL FOR NEXT