Government statue funeral to protest onion export ban
Government statue funeral to protest onion export ban 
महाराष्ट्र

कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ सरकारच्या पुतळ्याची अंत्ययात्रा

सकाळ वृत्तसेवा

राहुरी : कांद्याचे भाव घसरल्याने, तसेच निर्यातबंदीच्या निषेधार्थ आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी बाजार समितीत केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकऱ्यांनी नगर-मनमाड महामार्गावर दहा मिनिटे "रास्ता रोको' आंदोलन केले. 


"स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे, तालुकाध्यक्ष प्रकाश देठे, अतुल तनपुरे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांनी अचानक आंदोलन केले. राहुरी बाजार समितीत कांदाविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांनीही आंदोलनात भाग घेतला. केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी केल्याने भाव घसरले. त्यामुळे सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.


शेतकऱ्यांनी बाजार समितीसमोर नगर-मनमाड महामार्गावर दहा मिनिटे "रास्ता रोको' आंदोलन केले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलनामुळे सकाळी बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले नव्हते. आंदोलन संपताच पुन्हा लिलाव सुरू झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT