Governor Ramesh Bais arrived at RajBhavan Mahabaleshwar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ramesh Bais : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर महाबळेश्‍वरमध्ये राज्यपालांचं आगमन; दौऱ्यात काय शिजणार?

राज्यपाल रमेश बैस यांचे राजभवन महाबळेश्‍वर येथे आगमन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाबळेश्‍वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली.

महाबळेश्‍वर : राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांचे राजभवन महाबळेश्‍वर (Mahabaleshwar Rajbhavan) येथे आगमन झाले आहे. राज्यपाल बैस यांचे स्वागत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.

महाबळेश्‍वर पालिकेच्या प्रशासक पल्लवी पाटील यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॅा. शीतल जानवे-खराडे, प्रांत राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार तेजस्विनी पाटील, बांधकाम विभागाचे अजय देशपांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश बैस हे आज (मंगळवारी) सकाळी श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे दर्शनासाठी जाणार आहेत. दुपारी १२ वाजता राजभवन महाबळेश्‍वर येथे त्यांची जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आहे. जिह्यातील आमदार, खासदारांना भेटीसाठी काही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. तसेच किल्ले प्रतापगड परिसरालादेखील ते भेट देत श्री भवानी मातेचे दर्शन घेणार आहेत.

राज्यपाल गुरुवारी (ता. २५) सकाळी १० वाजता महाबळेश्‍वर राजभवन येथून वाहनाने वाई येथील किसनवीर महाविद्यालयाच्या हेलिपॅड येथे पोहोचतील. हेलिकॉप्टरने राजभवन मुंबई येथे रवाना होणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून, मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाबळेश्‍वर-पाचगणीमध्ये वाहतूक कोंडी

राज्यपाल रमेश बैस यांचे महाबळेश्‍वर येथे आगमन होण्यापूर्वी महाबळेश्‍वर-पाचगणीदरम्यानची वाहतूक थांबविण्यात आली होती. परिणामी, प्रचंड वाहतूक कोंडी होऊन सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पर्यटकांना तासनतास अडकून पडावे लागले. पोलिसांच्या वतीने मुख्य रस्त्यांसह पर्यायी रस्त्यावरील वाहतूक थांबविण्यात आल्याने पर्यटक अडकून पडले होते. वाई ते महाबळेश्‍वर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मुख्य रस्त्यांसह चौकाचौकात पोलिस कर्मचारी तैनात केले होते. राज्यपाल येण्याआधी वेण्णालेक नौकाविहारासाठी पर्यटकांसाठी काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. महाबळेश्‍वरला उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची मोठी रेलचेल आहे. शनिवार व रविवार वीकएंडला आलेले पर्यटक पुन्हा परतीच्या दिशेने निघाले असता मुख्य महाबळेश्‍वर-पाचगणी रस्त्यासह लिंगमळा रस्ता अशा अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक थांबविण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. स्थानिकांनादेखील याचा मोठा त्रास सहन करावा लागला.

पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श - राज्यपाल रमेश बैस

भिलार : महाबळेश्‍वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याची भावना राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली. महाबळेश्‍वर येथे दौऱ्यावर आले असता राज्यपाल श्री. बैस यांनी भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, उपसरपंच सुनीता भिलारे, सदस्य वंदना भिलारे, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुस्तकांचे गाव भिलार पाहायला मिळाले, हे सौभाग्य असल्याची भावना व्यक्त करून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, ‘या गावातील लोकांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. देशातील नागरिकांसाठी ज्ञानाचे भांडार खुले केले आहे. आजकालच्या इंटरनेटच्या जगात लोकांचे पुस्तक वाचन कमी झाले आहे; पण या गावात लोकांनी पुस्तकांसाठी राहत्या घरातील जागा दिली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे.’ संपूर्ण गाव म्हणजेच ग्रंथालय असणे ही एक आगळीवेगळी आणि आनंदाची गोष्ट असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी राज्यपाल श्री. बैस यांनी राज्य मराठी विकास संस्थेच्या कार्यालयास भेट देऊन पुस्तकाचे गाव या संकल्पनेची माहिती घेतली. तसेच गावातील शशिकांत भिलारे, वंदना भिलारे, प्रशांत भिलारे यांच्या घरातील पुस्तकालयासही भेट दिली.

दरम्यान, त्यांनी प्रथम पुस्तकाच्या प्रकल्प कार्यालयास भेट दिली, तेथील कामकाजाची माहिती घेतली आणि प्रकल्प कार्याची ध्वनी-चित्रफीत पहिली. यावेळी राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, महाबळेश्‍वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी शीतल जानवे - खराडे, नितीनदादा भिलारे, प्रवीण भिलारे, राजेंद्र भिलारे, तानाजी भिलारे, किसन भिलारे, तेजस्विनी भिलारे, शशिकांत भिलारे, रूपाली कांबळे, आनंदा भिलारे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT