Sharad Pawar : "हायड्रोजन गॅस हे पुढचे व्हर्जन"  Sakal
महाराष्ट्र बातम्या

पाहुण्यांनी पाहुण्यांसारखं रहावं, अजीर्ण होईल इतपत राहू नये: शरद पवार

सकाळ डिजिटल टीम

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टींवर आपली मते मांडली आहेत. केंद्राकडून काही सरकारी तपास यंत्रणाचा वापर राजकीय हेतूसाठी सतत केला जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सीबीआय, ईडी, आयटी आणि एनसीबी यासारख्या केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर भाजप राजकीय हेतूसाठी करत आहे, असेही शरद पवार म्हणाले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी सीमाप्रश्नावरही आपलं मत व्यक्त केलं.

छापेमारीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी म्हटलंय की, मी अजित पवारांचं स्टेटमेंट वाचलंय. पाहुणे येतात अनेक ठिकाणी येतात. एक दिवस येतात, दोन दिवस येतात, तीन दिवस येतात. मात्र आजचा सहावा दिवस आहे. पाहूणचार घ्यावा, मात्र, त्यामध्ये अजीर्ण होईल इतपत पाहुणचार असू नये. माझा अनुभव असाय की, तिन्ही मुलींचा कारखाना नाहीये, एक पब्लिकेशनमध्ये आहे, एक डॉक्टर आहे आणि एक हाऊसवाईफ आहे. या तिघींचाही काहीही संबंध नाहीये. दोन-तीन दिवस झाले, घरचे वाट बघत असतील. आम्हाला सूचना आहेत, की सूचना मिळाल्याशिवाय, सांगितल्याशिवाय घर सोडायचं नाही.

पुढे ते म्हणाले की, आतापर्यंत अशा एजन्सीनी अनेकवेळा चौकशी केली आहे. मात्र असं सहा दिवस चौकशी करण्याचा प्रकार पहिल्यांदाच केला आहे. मात्र, याबाबत तक्रार करण्याची ही वेळ नाही. कोल्हापूरला चौकशी केली, तिथे फक्त 18 माणसं गेली. 18 दिवस सहा दिवस घऱामध्ये... पाहूण्यांनी घेतलेला हा पाहूणचार अडचणीचा होतो. जे पाहिलं नाही ते पहायला मिळतंय. सत्तेचा असा गैरवापर आम्ही कधी केला नाही, करणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: वांद्रे कोर्टानंतर आता टाटा मेमोरियल; बॉम्ब धमक्यांची मालिका सुरूच,पोलिसांचा हाय अलर्ट

'गहराइयां सिनेमातील इंटिमेंट सीन खूप विचित्र होता' दीपिकाने सांगितलेला अनुभव, म्हणालेली...'सीन करताना मला...'

Deepika Padukone : हटके अंदाजात दीपिकाने वाढदिवस केला साजरा, चाहत्यांसोबत केक कटिंग आणि बरच काही... Viral Video

Latest Marathi News Live Update : आम्ही निवडणुकीत अजित पवार यांना मागे टाकून पुण्यात विजय मिळवू - भाजप नेते राम कदम

बेन स्टोक्स-मार्नस लॅब्युशेन भिडले, Ashes च्या शेवटच्या सामन्यात राडा; Video Viral

SCROLL FOR NEXT