पुणे : सिल्वर ओकवरील हल्ल्याप्रकरणी एसटी कामगाराचे वकील गुणरत्न सदावर्ते हे पोलिसांच्या ताब्यात होते. सुनावणीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडी दिली गेली आणि त्यांचा ताबा सातारा पोलिसांनी घेतला होता. सातारा पोलिसांच्या कोठडीनंतर त्यांचा ताबा न्यायालयाने पुन्हा कोल्हापूर पोलिसांना दिला आहे. त्यांच्यावर अडचणीत भर पडत असताना त्यांच्यावर पुण्यातही गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादीने केलेली आहे. यासाठीचा तक्रार अर्ज पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आला आहे.
एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीने मिळून युट्यूब चॅनेलवर मराठा समाजाची उत्पत्ती कशी झाली व कुठून झाली यावर आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. संविधानाने त्यांना बोलण्याचा जरी अधिकार दिला असला तरी त्यांनी मर्यादा ओलांडली आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडावी व जातीमध्ये वाद लावून समाजात अराजकता माजेल असं हे कृत्य असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचा अर्ज शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आला आहे.
दरम्यान सदावर्ते यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी जाहीर केल्यानंतर सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांचा ताबा कोल्हापूर पोलिसांकडे गेला असून मराठा समाजाबाबतच्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर अकोला, सातारा, कोल्हापूर आणि बीडमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडत असून आता पुण्यातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी एसटी कामगारांनी हल्ला केला होता. त्यादरम्यान कामगारांना चिथावल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. पण मराठा समाजाबद्दल विधानामुळे त्यांच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे त्यांना जरी न्यायालयीन कोठडी मिळाली असली तरी या गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना पोलिस कोठडीची हवा खावी लागणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.