Amruta Fadnavis  e sakal
महाराष्ट्र बातम्या

पुणेरी विवेकाचे ठेकेदार अमृता फडणवीसांच्या भाषेवर....; हरी नरकेंचा सवाल

अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली होती.

सुधीर काकडे

राज्यातील सर्व किराणा दुकानं आणि सुपर मार्केटमध्ये लवकरच आता वाईन मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयावर सध्या विरोधकांकडून मोठया प्रमाणात टीका सुरू आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, त्यांनी वाईनच्या (Wine in Supermarkets) निर्णयासह महाविकास आघाडीमधील तीन्ही पक्षाच्या नेत्यांचा समाचार घेतला आहे. नवाब मलिक, संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. त्यावर आता सामाजिक विषयांचे अभ्यासक प्राध्यापक हरी नरकेंनी (Professor Hari Narke) टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी संजय राऊत, नवाब मलिक आणि नाना पटोलेंवर टीका केली. थोडक्यात उत्तरं द्या म्हणत ५० मार्कांची प्रश्नपत्रिकाच त्यांनी सोडवायला दिली होती. "Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले .....या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ?" असा पहिला प्रश्न त्यांनी विचारलाय. दुसऱ्या प्रश्नात रिकाम्या जागा भरा म्हणत त्यांनी "_____शराब नही होती, हरामख़ोर का मतलब _____है, सुनने में आया है _____नामर्द है" असे प्रश्न दिले आहेत. त्यावर आता हरी नरकेंनी प्रतिक्रीया दिली असून, अमृता फडणवीस यांच्या भाषेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. "सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांची संस्कारी भाषा बघा! हेच लोक अहोरात्र आम्हाला भाषेवर प्रवचनं देत असतात. यांची व त्यांच्या संस्कारी पतीची बाजू घेऊन शेकडो वेळा पोस्ट टाकणारे, किरण माने यांच्या भाषेवरून त्यांना ट्रोल करा अशी चिथावणी देणारे आज काय म्हणतील असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT