Uddhav Thackeray Eknath SHinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

साळवेंपासून जेठमलानींपर्यंत; 'खऱ्या' शिवसेनेसाठी दिग्गज वकील रणांगणात

महाराष्ट्रातला शिंदे ठाकरेंचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

वैष्णवी कारंजकर

महाराष्ट्रातला ठाकरे शिंदे वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणी आज सुनावणीही होणार आहे. दोन्ही पक्ष या कायदेशीर लढाईसाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही पक्षांनी एकमेकांसमोर तोडीस तोड वकील उभे केले आहेत. जाणून घ्या या वकिलांबद्दल... (Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme court of India)

एकनाथ शिंदे गटाकडून प्रसिद्ध वकील हरीश साळवे (Harish Salve) बाजू लढवणार आहेत. तसंच भारताचे माजी अटॉर्नी जनरल आणि वकील मुकुल रोहतगीसुद्धा (Mukul rohatagi) हे प्रकरण मांडणार आहेत. त्याचबरोबर मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानीही शिंदेंच्या पाठिशी असतील.

तर उद्धव ठाकरेंची बाजू अभिषेक मनू सिंघवी सांभाळणार आहेत. तसंच दिग्गज वकील कपिल सिब्बलसुद्धा उद्धव ठाकरेंची बाजू लढवणार आहेत. त्याशिवाय राजीव धवन आणि देवदत्त कामत हेदेखील या ठाकरेंच्या बाजूने असतील. तर नरहरी झिरवळ हेदेखील या लढाईत आहेत. त्यांच्या बाजूने वकील रविशंकर जांध्याल असतील. तर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे बी पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या आधी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : ऐन दिवाळीत खंबाटकी घाटात मोठी वाहतूक कोंडी; वाहनचालक हैराण, सातारा-पुणे महामार्गावर लांबलचक रांगा

VIDEO : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग, अनेक प्रवासी जखमी; सकाळी ७ वाजता घडली दुर्घटना

संदर्भ पत्र का दिले नाही? जातीयवादाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर प्राचार्यांनी केला खुलासा

Diwali Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग संध्याकाळी नाही तर 'या' वेळी होणार; का बदलली वेळ?

Latest Marathi News Live Update : गरीब रथ एक्सप्रेसला भीषण आग

SCROLL FOR NEXT