महाराष्ट्र बातम्या

आरोग्यभरती घोळ: परीक्षा गोंधळात! काळ्या टोप्या घालून विद्यार्थ्यांकडून निषेध

सकाळ डिजिटल टीम

पुणे : मागील महिन्यात आयोजित आरोग्यसेवेतील पदभरतीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळ आजही सुरुच आहे. उमेदवारांना चुकीचे प्रवेशपत्र किंवा प्रवेशपत्र न मिळणे आदी तक्रारी आल्या होत्या. प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेण्यासाठी आवश्यक केंद्रांची कमतरता, उत्तरप्रदेशपासून चीनच्या वूहाण प्रांतातील पिनकोड प्रवेशपत्रावर देण्यात आला होता. राज्यातील आठ लाख ६० हजार उमेदवारांच्या भवितव्य निश्चित करणारी ही लेखी परीक्षा प्रचंड अनागोंदीमुळे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना स्वतः माध्यमांपुढे येत पुढे ढकलावी लागली होती. त्यांनी त्यावेळी सारवासारव केली खरी; मात्र अजूनही हा प्रश्न सुटल्याचं दिसून येत नाहीये.

आज गट क ची पुढे ढकललेली परीक्षा होत असून या परीक्षेतही तुफान गोंधळ पहायला मिळतो आहे. दहा वाजून गेल्यावरही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा मिळाली नाहीये. काही ठिकाणी केंद्रावर पेपरच आलेले नाहीयेत. याबाबत आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा केंद्रांवर मोबाईल जामर नाहीयेत तसेच एकाच बेंचवर दोन विद्यार्थी कसे बसू शकतात? असा सवाल देखील विद्यार्थी करत आहे. इतकंच नव्हे तर एकाच दिवशी दोन शहरांतील दोन केंद्रांवर पेपर असणारे हॉल तिकीट देखील विद्यार्थ्यांना प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी ट्विटरवर आपला संताप व्यक्त करत आहेत.

सकाळी दहा वाजता हा पेपर नियोजित आहे. मात्र 10 वाजून गेल्यावरही विद्यार्थ्यांना पेपर प्राप्त झाला नाहीये. त्यांना कुणीही नीटसं गाईड करत नाहीये. मुलांना क्रमांक मिळाले नसून अभूतपूर्व असा गोंधळ पहायला मिळतो आहे.

नाशिकच्या केंद्रावरील घोळ

विद्यार्थी ५००-१००० किलोमीटर प्रवास करुन परीक्षेसाठी गेले असताना, नाशिकच्या या परीक्षा केंद्रावर काही पदांचे पेपरच आले नसल्याचे परीक्षा केंद्र प्रमुखांचे म्हणणे आहे. आज सगळ्यांनी टोप्या घालून आणि काळी फित लाऊन निषेध व्यक्त करावा.

पुण्याच्या केंद्रावरील घोळ

आबेदा इनामदार कॉलेज, कॅम्प, पुणे येथील परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थांच्या म्हणण्याप्रमाणे सकाळचे १०:०२ वाजूनही विद्यार्थ्याना पेपर मिळालेला नव्हता आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती.

परीक्षा केंद्र कोड :- ७१२५

एका बेंचवर दोन विद्यार्थी

परीक्षा केंद्र कोड :- ८२०१, एका बेंचवर दोन विद्यार्थी तर आहेच पण विद्यार्थांनी फोटो पाठविला आहे याचा अर्थ, बिनबोभाटपणे मोबाईल वर्गात घेऊन जाऊ दिला गेलेला आहे. आमचे भविष्य अंधारात लोटणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.

यावेळी आपला संताप व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी ट्विट करत म्हटलंय की, टोपे साहेब, तुम्ही राजीनामा द्या. का तुम्ही गरीब, शेतकऱ्यांनच्या मुलांच्या आयुष्याशी खेळताय? हेच का नियोजन? तुम्हाला तुमच्या पदावर राहण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाहीये. ही परीक्षा रद्द करून #MPSC मार्फतच झाली पाहिजे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return: वेलकम शुभांशु! अंतराळात तिरंगा फडकवून पृथ्वीवर परतले शुभांशु शुक्ला, कॅलिफोर्नियाच्या समुद्रावर केलं लँडिंग

Mumbai Rain: मुंबईत जोरदार पाऊस! अनेक भागात पाणी साचले, विमानांचे वेळापत्रक बिघडले अन्...; जाणून घ्या स्थिती

Crime News: धावत्या बसमध्ये प्रसूती; नवजात बाळाला रस्त्यावर फेकून दिल्याची अमानुष घटना

Mumbai News: मुंबईतील २० कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याची चौकशी करा, भाजपची पालिका आयुक्तांकडे मागणी

Shubhanshu Shukla Return Live : अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतले

SCROLL FOR NEXT