Rajesh Tope 
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा, आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे संकेत 

उमेश वाघमारे

जालना : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी किमान १५ दिवसांचा लोकडाऊन गरजेचा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व कॅबिनेट लॉकडाऊन संदर्भातील निर्णय घेतला. जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केले, तर १५ दिवसांचा राज्यात लॉकडाउन लागू शकले,  असे संकेत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (ता.११) जालना येथे पत्रकारांशी बोलताना दिले आहेत. श्री.टोपे म्हणाले की, राज्यास रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा सध्याची पन्नास हजार पुरवठा केला जात आहे. मात्र, मध्यंतरीच्या काळात काही काळा बाजार झाला. त्यामुळे आता थेट कंपनीकडून शासकीय रुग्णालययास रेमडेसिव्हीर इंजेक्शन पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांचे या इंजेक्शनच्या साठ्यावर नियंत्रण असेल. तसेच हे इंजेक्शन शासनाने ठरवून दिलेल्या दराने विक्री करणे बंधनकारक आहे. तसेच राज्यात बाराशे मॅट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन होत असून त्याचा वापर आरोग्य विभागासाठी होत आहे. मात्र, या पुढे हे ऑक्सिजन इतर कुठे वापरू नये. यासाठी लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी ऑक्सिजन टँकरवर जेपीएसव्दारे नियंत्रण ठेवण्यात येणार असून उद्योजकाने ऑक्सिजनचा साठा केला तर त्यांच्यावर ही कारवाई केली जाईल असे आरोग्य मंत्री श्री.टोपे यांनी म्हटले आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १५ दिवसांचा लोकडाऊन आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांवर सर्वांनी  विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व कॅबिनेट लोकडाउन संदर्भातील योग्य तो निर्णय घेतला. जर मुख्यमंत्र्यांनी तो मान्य केला, तर १५ दिवसांचा लोकडाऊन लागू होऊ शकतो, असे संकेत ही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.

संपादन - गणेश पिटेकर
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: आउटसोर्स एजन्सीचे पोषण, कामगारांचे कुपोषण; कंत्राटी कामगार धोरणातून उभारली शोषणाची नवी व्यवस्था

Love Jihad funding : ‘लव्ह जिहाद’चे फंडिंग रोखण्याचे आव्हान, किरीट सोमय्या शिरोलीत ग्रामपंचायतीस भेट; नाशिक, शिरोलीचा मास्टरमाईंड एकच

Nagpur News:ऑरेंज सिटी बनत आहे ‘गॅस चेंबर’!; स्वच्छ हवेसाठी नागपूरकर झाले व्याकूळ!

Nagpur Sports News: कबड्डीने धरली आधुनिकतेची कास; सुनेत्रा पवार : छत्रपती शिवाजी महाराज करंडक कबड्डी स्पर्धेला सुरुवात

Palghar MP Accident : खासदार हेमंत सावरा भीषण अपघातातून थोडक्यात बचावले, डंपरने गाडीला धडक दिली अन्...

SCROLL FOR NEXT