Temperature 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात उन्हाचा चटका वाढला; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

सकाळवृत्तसेवा

पुणे - अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्याने राज्यात होळीनंतर आता उन्हाचा चटका वाढत आहे. पुढील चोवीस तासांमध्ये विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, पुण्यातही कमाल तापमानाचा पारा चाळीशीपर्यंत उसळी मारेल, असा इशारा हवामान खात्याने सोमवारी दिला. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र झाले आहे. यामुळे विदर्भ तापण्यास सुरुवात झाली असून कमाल तापमानाचा पारा चाळीशीपार गेला आहे. पुढील काही दिवसांत कमाल तापमानाचा पारा आणखी वाढेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सोमवारी (ता. २९) संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या चोवीस तासांत ब्रह्मपुरी येथे ४३.३  अंश सेल्सिअस या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. मध्य महाराष्ट्र आणि परिसर व दक्षिण महाराष्ट्र आणि परिसरात चक्रिय वाऱ्याची स्थिती आहे. तसेच बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती असून बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात पुढील दोन दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते अंदमानाच्या उत्तर भागात सरकेल. हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भाग चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. आज अरबी समुद्राच्या आग्नेय भागात त्याचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्याचा काहीसा परिणाम राज्यातील वातावरणावर होईल. राज्यातील उन्हाच्या चटक्यात वाढ होऊन उकाडा वाढेल. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. 

सध्या राज्यातील अनेक भागांत उन्हाचा पारा वाढू लागल्याने कोकणातील कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई येथे कमाल तापमानाचा पारा चाळीशी ओलांडली आहे. इतर भागांत कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या आत आहे. मध्य महाराष्ट्रातही उन्हाचा पारा वाढत आहे. खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील सोलापूर येथे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसवर नोंदविले गेले. मराठवाड्यातही ऊन वाढत असल्याने कमाल तापमानही वाढू लागला आहे. या भागात ३८ ते ३९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. विदर्भात सकाळपासून ऊन वाढत आहे. त्यामुळे तेथील बहुतेक सर्व जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर नोंदविले गेले.

पुण्यातही तापमान वाढणार
होळीनंतर पुणे शहर आणि परिसरात कमाल तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. या आठवड्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. किमान तापमानाचा पारा १८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला. सोमवारी सकाळी कमाल तापमान १.८ अंश सेल्सिअसने वाढून ३९.३ अंश सेल्सिअस झाले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोटात जोराची कळ, हायवेवर शौचालय दिसेना, गाडी पळवल्यानं मलाच ४ वेळा दंड झाला; न्यायमूर्तींनी NHAIला फटकारलं

BJP MLA: पाणी प्रश्नावर आवाज उठवला तर BJP आमदाराने थेट पायच तोडले... नेमकं काय घडलं? अजून एकालाही अटक नाही

Latest Marathi News Updates : शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन

Maharashtra Rain: पुढील तीन दिवस महत्त्वाचे! मुसळधारेसह भरतीचा इशारा; हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Pune News : सदनिकाधारक, भाडेकरूंना मोठा दिलासा; भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिकांवर अतिरिक्त सेवा शुल्क आकारता येणार नाही

SCROLL FOR NEXT