Weather update rising heat wave Updates sakal
महाराष्ट्र बातम्या

येत्या 4 ते 5 दिवसात उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात अलर्ट जारी

नागपुर, वर्धा, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळमध्ये अलर्ट जारी

हलिमाबी कुरेशी

देशात येत्या चार -पाच दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविलाय. विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेची झळ पोहोचणार असून विदर्भाला देखील अलर्ट देण्यात आल्याची माहीती, भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ सखा सानप यांनी दिलीय. वर्धा, चंद्रपूर,अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने हा अलर्ट नुकताच जारी केलाय. 28 एप्रिल ते 2 मे पर्यंत अलर्ट देण्यात आलाय. या भागातील नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडु नये, तसेच सतत पाणी, पन्ह ORS, ताक अशा गोष्टींनी स्वत:ला हायड्रेट ठेवावे असा सल्लाही देण्यात आलाय. (Heat wave will hit Indian peninsula)

महाराष्ट्रात एप्रिलच्या सुरुवातीला पारा ४४ अंस सेल्सिअस पर्यंत गेला होता. आता उत्तर भारत, मध्य भारतात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट असून उत्तर आणि मध्य भारतातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होणार असल्याची माहीती डॉ सानप यांनी दिलीय.

महाराष्ट्रात सर्वात जास्त तापमान ब्रम्हपूरी येथे 45.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. त्यापाठोपाठ अकोला आणि नागपूर 44.8 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 44.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झालीय. मध्य महाराष्ट्रात मालेगाव- 43.2, सोलापूर- 43 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेलेय. वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटांच्या प्रमाणात वाढ झाली असून हे हवामान बदलाचे संकेत असल्याची शक्यता वर्तविली जातेय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांना मुसळधार पावसाचा दिलासा! पण उन्हाचा चटका कायम; हवामान विभागाने नेमका काय वर्तवला अंदाज?

Archery Premier League: ‘मायटी मराठाज’ ठरले दुसऱ्या हंगामाचे विजेते, अंतिम सामन्यात दणदणीत विजय!

Amrakhand Recipe: दसऱ्याला घरीच बनवा बाजारासारखं घट्ट आणि मलाईदार आम्रखंड; जाणून घ्या सोपी रेसिपी

आजचे राशिभविष्य - 20 ऑक्टोबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 ऑक्टोबर 2026

SCROLL FOR NEXT