rain esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात येत्या 4 दिवसांत मुसळधार पाऊस; हवामानाचा इशारा

स्नेहल कदम

बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल होत आहेत. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे.

रत्नागिरी - गेली काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाचे रिपरिप तर काही ठिकाणी संततधार सुरु आहे. (Maharashtra Rain Update) बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात बदल होत आहेत. यामुळे राज्यात पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. यंदा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या श्रेणीमध्ये किंवा अधिक पाऊसाची नोंद झाली आहे. (Rain upadate)

दरम्यान, पुढच्या 12 तासात हे क्षेत्र अजून तीव्र होण्याची आणि पुढील 48 तासांत ओडीशाच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. (Monsoon Update) त्यामुळे पुढील चार-पाच दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. (Indian Metoprolol Department) याशिवाय काही ठिकणी मुसळधार पाऊस तर, काही ठिकाणी हाच पावसाचा जोर वाढणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. (Heavy Rainfall in Maharashtra)

दरम्यान, यावर्षी झालेल्या पावसामध्ये कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबईत अतिरिक्त पाऊसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे, मराठवाडा, औरंगाबाद, बीड, परभणी येथे अतिरिक्त पाऊसाच नोंद झाली आहे. याउलट विदर्भात मात्र एकाही जिल्ह्यात अतिरिक्त पाऊस झालेला नाही. गेल्या दोन आठवड्यात पाऊस पडल्यामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे. आता पुढील 4-5 दिवस राज्यात पुन्हा गडगटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकणसह, पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस असणार आहे. त्यामुळे या प्रदेशातील लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच

LPG वर संकट की दिलासा? होर्मुझ तणावातही सरकारचं मोठं आश्वासन; तुमच्या घरच्या गॅसबद्दल जाणून घ्या सत्य!

SCROLL FOR NEXT