Pravin Darekar News Updates | High Court refuses to grant relief to Praveen Darekar  टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

दरेकरांना दिलासा देण्यास HC चा नकार; अटकेची टांगती तलवार?

न्यायालयाच्या या निर्णयामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मजूर प्रकरणात दाखल गुन्ह्यात अटक न करण्याची मागणी मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे दरेकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. मजूर प्रकरणात अटक न करण्याची मागणी प्रवीण दरेकर यांनी केली होती. मात्र, न्यायालयाने दरेकरांची ही मागणी फेटाळून लावल्याने दरेकरांवर अटक होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. (High Court refuses to grant relief to Praveen Darekar)

मजूरप्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात याचिका दाख करा असे निर्देश न्यायालयाने दरेकर यांना दिले आहेत. या प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी दरेकरांविरोधात मुंबईमध्ये गुन्हा करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी दरेकर यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

सध्या या प्रकरणातील चौकशी प्राथमिक अवस्थेत असल्याने न्यायालयाने कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती. तसेच यामुळे तपासावर परिणाम होईल अशी बाजू सरकारकडून न्यायालयात मांडण्यात आली. तसेच या प्रकरणी दिलासा मिळण्यासाठी दरेकरांनी रितसर मुंबई सत्र न्यायालयात याचिका दखल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, गुरुवारी अटकपूर्व जामिनासाठी याबाबत सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दरेकरांच्या वकीलांकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी, पण भारताला २०० धावांच्या आत रोखण्यात झिम्बाब्वेला यश; श्रेयस अय्यरची टीम व्हाईटवॉश देणार?

Viral Video : अंतराळातून दिसला भारताचा थक्क करणारा नजारा; वादळी ढग अन् विजांचा कडकडाट, ISS चा व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : AIMIMच्या नगरसेवकावर प्राणघातक हल्ला; चंद्रपूरमध्ये खळबळ

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

SCROLL FOR NEXT