Mumbai burkha case sakal
महाराष्ट्र बातम्या

Mumbai: पोलिसांमुळं हिंदू महिलेवर दररोज बुरखा घालण्याची वेळ; मुंबईतील महिलेवर ओढवलाय बिकट प्रसंग

Mumbai Crime: शेवटी कामाच्या शोधासाठी रेखा मुंबईत निघून आली. नोकरी लागल्यावर तीने सासूला पैसै पाठवायला सुरुवात केली. तोपर्यंत बाळ सासूकडे होते. मात्र, बाळासाठी रेखाने नोकरी सोडली कोविड काळात ती माहेरी गेली.

सकाळ डिजिटल टीम

नितीन बिनेकर, सकाळ, मुंबई

गेल्या सात महिन्यापासून रेखा (नाव बदलले) बुरखा घालून कामावर जाते. हिंदू असूनही रेखावर बुरखा घालण्याची वेळ आली आहे. कारण तीचा पती तिला कुठेही मारहाण करतो. कौटुंंबिक हिसांचाराची तक्रार दाखल करुनही पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे पतीपासून स्वताचे संरक्षण करण्यासाठी हतबल होऊन रेखा बुरखा घातले.

दापोलीत राहणाऱ्या रेखाचे लग्न २०१६ मध्ये नातातल्या एका तरुणाशी झाले. त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला. मात्र पती दारुडा असल्यामुळे तिला दररोज मारहाण करायचा. त्याला सुधरवण्याचा प्रयत्न केला.मात्र काहीच फायदा झाला नाही. बिनेकर

सासूही हतबल होती. शेवटी कामाच्या शोधासाठी रेखा मुंबईत निघून आली. नोकरी लागल्यावर तीने सासूला पैसै पाठवायला सुरुवात केली. तोपर्यंत बाळ सासूकडे होते. मात्र, बाळासाठी रेखाने नोकरी सोडली कोविड काळात ती माहेरी गेली.

मुंबईत आल्यावर रेखाची कैलास नावाच्या तरुणाशी ओळख झाली. कैलासने रेखाला मुंबईत खूप मदत केली. तिला स्वताचे घर दिले. मात्र पुढे कैलासने रेखाला लग्नासाठी मागणी घातली. पहिल्या पतीशी घटस्फोट झाला नाही. त्यामुळे मी लग्न करु शकत नाही असे रेखाने त्याला स्पष्ट सांगितले. मात्र त्याने लग्नासाठी आत्महत्या करण्याची धमकी दिली.

दुसरीकडे कैलासचे कुटुंबीयही रेखावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होते. अखेर रेखाने कैलासशी लग्न केले. दरम्यान रेखा वाडीया रुग्णालयाला कामाला लागली.त्यावेळी तिचे दुसऱ्या तरुणाशी संबंध असल्याचा संशय कैलासला येत होता. त्यावरुन त्याने रेखाला मारहाण करण्यास सुरुवात केला. भर रस्त्यात कुठेही तिला मारहाण करत होता. रेखाने पोलिसाकडे यासंदर्भातील तक्रार केली. मात्र,दोघांची समजून घालून पोलिसांनी परत पाठवले. यानंतरही रेखावर अत्याचार सुरुच होते. शेवटी तीने त्याच्यापासून दूर राहण्यास सुरुवात केली.

या दरम्यान केलास तिची समाज माध्यमावर चारीत्रहनन करुन तिला त्रास देणे सुरु ठेवले. रेखाचा नंबर सार्वजनिक केला. या सर्व प्रकारामुळे रेखाने आपली नोकरी गमावली. शेवटी पिडीतेने मर्जी या सामाजिक संस्थेकडे धाव घेतली. या संस्थेने रेखाला तिच्या पायावर उभ राहण्यासाठी मदत केली असून.तिला कायदेशीर मदत करण्याचे काम सदर संस्था करत आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

घाटकोपर पोलीस ठाण्यात रेखाने या प्रकाराची तक्रार दाखल केली. पोलिसांंनी केवळ एनसी दाखल करून घेतली. मात्र, कैलासवर काहीच कारवाई केली नाही. दोन ते तीन वेळा तीने पोलिसाकडे दाद मागीतली. पोलिसांनी रेखाला कोर्टात जाण्यासाठी सांगीतले. मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे रेखा न्यायालयात गेली नाही. शेवटी पतीपासून सरंक्षण करण्यासाठी तीने बुरखा घालणे सुरु केले. गेल्या जूनपासून रेखा बुरखा घालून कामावर जाते.(Ignorance of the police)

माझ्या पतीपासून मला आणि माझ्या मुलाच्या जीवाला धोका असल्यामुळे मी गेल्या सात महिन्यापासून बुरखा घालावे लागते.मला सन्मानाने काम करता येत नाही. पोलिसांकडे तक्रार करुन कारवाई झाली नाही. मला सरकारने न्याय द्यावा,

रेखा, पीडित महिला,

तिला निर्भयपणे समाजात जगता यावे यासाठी शासन, प्रशासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करण्यासाठी तिला सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करू. शासनाने आणि संबंधित प्रशासनाने कौटुंबिक हिंसाचाराच्या शिकार झालेल्या महिलांच्या समस्या आणि सुरक्षेकडे गांभीर्याने पाहण आवश्यक आहे. जेणेकरून स्वत.च जीव वाचवण्यासाठी एखाद्या स्त्रीला मजबुरीने बुरखा घालावा लागणार नाही.

- प्राप्ती कोळी, समन्वयक, मर्जी संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump India Visit : डोनाल्ड ट्रम्प यांना आठवली दोन वर्ष जुनी मैत्री, लवकरच येणार भारत दौऱ्यावर; अमेरिकी दुतावासाने सांगितली इनसाईट स्टोरी...

'केस नं ७३' मध्ये अमित शिंदे साकारणार 'ही' भूमिका; उलगडणार गूढ रहस्य

Makar Sankranti Sale : घाई करा! मकर संक्रांतीनिमित्त 'स्मार्ट बाजार'ला मोठी ऑफर; 'या' वस्तू झाल्या एकदम स्वस्त

Weekly Horoscope 12 to 18 January 2026: मेष, कर्क अन् मकरसह 'या' राशीच्या लोकांना मिळेल त्रिग्रह योगाचा फायदा, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Commerce Graduates Protest : शासकीय भरती प्रक्रियेत कॉमर्स पदवीधरांवर अन्याय, विद्यार्थ्यांचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT