Sambhaji Bhide esakal
महाराष्ट्र बातम्या

"हिंदुस्थानला गांधीबाधा झालीए"; संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त विधान

मिरज येथे शिवाजी महाराज पुतळ्या परिसरातील सुशोभिकरणाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ डिजिटल टीम

मिरज : वादग्रस्त विधानांमुळं कायम चर्चेत असलेले शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत यांपैकी एक गांधीबाधा आहे, असं भिडे यांनी म्हटलं आहे. सांगलीतील मिरज (Miraj) येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. (Hindustan infected by Gandhi Controversial statement of Sambhaji Bhide in Miraj)

मिरजमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुतळ्याच्या परिसरात सुशोभीकरण करण्यात आलं असून याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संभाजी भिडे बोलत होते.

भिडे म्हणाले, "समाजात काहींना खान्यापिण्यात कमी जास्त झाल्यास अनेकांना विषबाधा होते. ही विषबाधा, भूतबाधा याच्यावरती उपाय आहे. पण हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत, एक म्लेंछ बाधा, एक आंग्ल बाधा आणि एक गांधी बाधा. या तीनही बाधांवरचा तोगडा कोणचा असेल तर ते शिवछत्रपती आणि संभाजी महाराज आहेत"

...तर १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल

दरम्यान, हिंदुस्थानला जगात लौकिक मिळवून द्यायचा असेल तर एकच उपाय आहे. तो म्हणजे देशातील १२३ कोटी लोकांचा रक्तगट बदलावा लागेल. हा रक्तगट शिवाजी-संभाजीच करायला हवा. शिवछत्रपतींच्या उपासनेतून हे होऊ शकेल. राष्ट्रोद्धार, राष्ट्रउन्नती हिंदुंच्या रक्तात उत्पन्न करण्यासाठीच आपला जन्म झाल्याचं आपण रोज भगवंताला म्हटलं पाहिजे, असा सल्लाही यावेळी भिडेंनी उपस्थितांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT