Hindustani Bhau Participate in student Agitation e sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; हिंदुस्तानी भाऊ म्हणतो, तोडफोड करणारे...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप हिंदुस्तानी भाऊवर करण्यात आला आहे.

सुधीर काकडे

राज्यात सध्या दहावी बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात याव्यात ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी आंदोलन सूरू केलं आहे. या आंदोलना मागे विकास पाठक अर्थात हिंदुस्तानी भाऊचा हात असल्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांकडून समोर आलेल्य काही प्रतिक्रीयांमधूनही हे समोर आलंय. त्यानंतर या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी विकास पाठकचा शोध सुरू केला असून, आता विकास पाठकने आपली प्रतिक्रीया दिली आहे. (Hindustani Bhau on Student Protest)

विकास पाठक यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, लाखो विद्यार्थी जर माझं ऐकत असतील, तर त्यामागे काही तरी कारण असेल. आपला कुठल्याही पक्षाशी संबंध नाही. विद्यार्थ्यांचं म्हणणं नेत्यांनी ऐकलं असतं तर ते रस्त्यावर आले नसते. विद्यार्थ्यांच्या रस्त्यावर येण्यासाठी सरकार जबाबदार आहे. मागच्या तीन महिन्यांपासून ट्विटरवर ट्रेंड सूरू आहे. परीक्षा ऑफलाईन होऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती असं विकास पाठक म्हणाले

तसंच आपण कोणत्याही विद्यार्थ्यांना आपण भडकावलं नसून, माझे विद्यार्थी असं करू शकत नाही असं पाठक म्हणाले. तसंच तोडफोड करण्यात विद्यार्थ्यांचा सहभाग नसून, तोडफोड करण्यामागे दुसऱ्या लोकांचा हात असल्याचा आरोपही विकास पाठकने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT