Will Hindustani Bhau Be Arrested? Sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थी आंदोलन : 'हिंदुस्थानी भाऊ'ची पोलीस कोठडीत रवानगी

सोमवारी दहावी-बारावीच्या लाखो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले होते.

निनाद कुलकर्णी

मुंबई : दहावी-बारावीचे विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी (Student Protest ) भडकवल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) उर्फ विकास पाठकला चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. सोमवारी राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरा बाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. धारावी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोघांना धारावी पोलिसांनी अटक केली. (Hindustani Bhau Get Four Days Police Custody)

कोरोनामुळे (Corona Pandemic) गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाइन होत आहे. मग परीक्षा ऑफलाइन कशासाठी? असं म्हणत सोमवारी दहावी-बारावीचे विद्यार्थी लाखो विद्यार्थी राज्यभरात रस्त्यावर उतरले होते. (Student Protest For Online Exam ) अचानक झालेल्या या आंदोलनामुळे खळबळ उडाली होती. या आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणी धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून विकास पाठक आणि इकरार खान वखार खान यांची चौकशी करण्यात आली होती तसेच या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, विकास पाठक याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरवण्यामागं षडयंत्र असल्याचा संशय - गृहमंत्री

या प्रकरणाची राज्याच्या गृहविभागाकडून देखील गंभीर दखल घेण्यात आली असून यामागे षडयंत्र असल्याचा संशय गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil On Student Protest) यांनी व्यक्त केला आहे. "विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणींबाबत काही भूमिका मांडायची असेल तर त्यांनी सरकारकडे मांडायला पाहिजे होती. पण मला असं वाटत नाही की विद्यार्थी अशा प्रकारे स्वतःहून रस्त्यावर आले असतील. यामागे कुठलीतरी शक्ती असली पाहिजे ज्यामुळं जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांकडून हे घडवून आणण्यात आलं आहे, असे मत वळसे पाटील यांनी घटनेनंतर व्यक्त केले होते. तसेच या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देखील पोलिसांना देण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली ! सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश

Psychological Facts About Dreams: स्वप्नात नेहमी Ex Partner दिसतो? एकच व्यक्ती वारंवार दिसण्यामागे असू शकतं 'हे' कारण

Air India च्या विमानाने उड्डाण घेताच इंजिनमध्ये बिघाड, दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या विमानाचं Emergency Landing ; अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली!

Latest Marathi News Live Update : संजय राऊतांची राज ठाकरेंशी भेट; शिवतीर्थवर २० मिनिटांची चर्चा

Pune Kho-Kho Team: पुण्याचे संघ दोन्ही विभागांत अंतिम फेरीत; राज्य अजिंक्यपद खो-खो, धाराशिव, मुंबई उपनगरही फायनलमध्ये

SCROLL FOR NEXT