cancer sakal
महाराष्ट्र बातम्या

Women Cancer Symptoms : खळबळजनक! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तब्बल १४ हजारांहून अधिक महिलांमध्ये आढळली 'कॅन्सर'सारखी लक्षणे

Prakash Abitkar Statement : राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच विधिमंडळात दिली आहे माहिती; जाणून घ्या आणखी काय सांगितलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Maharashtra Health Alert : महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्याशी संबंधित एक खळबळजनक आणि तितकीच चिंताजनकही बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात संजीवनी योजनेअंतर्गत तपासणी मोहीम राबवल्यागेल्यानंतर तब्बल १४ हजार ५०० पेक्षाही जास्त महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे दिसली आहेत. 

संजीवनी योजनेअंतर्गत ८ मार्चपासून आतापर्यंत एकूण २.९ लाख महिलांचे सर्वेक्षण केले गेले आहे. ज्यामध्ये या महिलांना कर्करोगाशी संबंधित प्रश्नांची उत्तरं द्यावी लागली होती. यापैकी १४ हजार ५४२ महिलांमध्ये कर्करोगासारखी लक्षणे आढळून आली.

याशिवाय या महिलांची तपासणी आणि चाचणी केली गेली तेव्हा तीन महिलांना गर्भाशयाचा कर्करोग, एकीला स्तनाचा कर्करोग आणि आठजणींना तोंडाचा कर्करोग आढळून आला. ही माहिती खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीच आज विधिमंडळात दिलेली आहे.

याचबरोबर आरोग्यमंत्र्यांनी हेही सांगितले की, हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ कर्करोग्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्या तत्काळ उपचारांसाठी मोहीम सुरू केली आहे. कर्करोगाच्या निदानासाठी ग्रामीण भागात आरोग्य शिबिरं आणि तपासणी आयोजित केली जातात.

तसेच, आठ जिल्हा रुग्णालयांमध्ये डे-केअर केमोथेरपी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत आणि सर्व जिल्ह्यांमध्ये ती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: बीडमध्ये राडा! लक्ष्मण हाके अन् पंडितांचे कार्यकर्ते समोरासमोर; हाकेंनी दिल्या थेट शिव्या

Latest Marathi News Updates: येवला रस्त्यावरील अतिक्रमण हटवले

Pratap Sarnaik: एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या हाती पगार येणार; परिवहन मंत्र्यांची घोषणा

Mutual Fund Tips: महिलांसाठी म्युच्युअल फंड: छोट्या गुंतवणुकीतून आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायचं?

नवा अंदाज, नवी जोडी! सुबोध भावे आणि मानसी नाईक घेऊन येतायत ‘सकाळ तर होऊ द्या’! दोघांचं ‘नाच मोरा’ गाणं प्रेक्षकांच्या मनाला भावलं!

SCROLL FOR NEXT